pic credit -social media
pic credit -social media

    पुणे : मुंबईत एअर होस्टेसची गळा चिरून निर्घृण हत्या करणाऱ्या आरोपीने पोलिस ठाण्यामध्ये आत्महत्या केल्याची घटना ताजी असतानाच आता पुण्यामधून एक धक्कादायक बातमी घटना समोर येत आहे. अहमदनगच्या कोपर्डी बलात्कार आणि हत्या प्रकरणातील आरोपी जितेंद्र शिंदेची (Jitendra Shinde) येरवडा कारागृहात (Yerawada Jail) आत्महत्या (suicide in custody) केल्याची माहिती समोर येत आहे. आज पहाटेच्या सुमारास  त्यानो आपलं जीवन संपवलं.

    काय आहे कोपर्डी प्रकरण?

    13 जुलै 2016 च्या संध्याकाळी अहमदनगर जिल्ह्यातल्या कोपर्डी इथल्या एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून तिची निर्घृण हत्या करण्यात आली होती. या प्रकरणी गावालगतच्याच वस्त्यांवर राहणारे जितेंद्र ऊर्फ बाबुलाल शिंदे (२५), संतोष गोरख भवाळ (३०) व नितीन गोपीचंद भैलुमे (२६) या तिघा आरोपींना अटक करून त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. 29 नोव्हेंबर 2017ला अहमदनगरच्या विशेष न्यायालयानं  तीनही आरोपींना दोषी ठरवत फाशीची शिक्षा ठोठावली. यासाठी एका विशेष फास्ट – ट्रॅक कोर्टाची स्थापना करण्यात आली होती. या आरोपींना कट रचून मुलीवर अत्याचार करणे, तिचा खून करणे, बालकांच्या लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार तिघांही आरोपींना दोषी ठरवण्यात आलं होतं.

    राज्यभरात झाली आंदोलन

    कोपर्डीतील १५ वर्षे वयाच्या शालेय मुलीवर तिघा नराधमांनी अत्याचार करून तिचा अत्यंत निर्दयपणे खून केल्याच्या घटनेचे राज्यभर पडसाद उमटले. एकवटलेल्या सकल मराठा समाजाने मोर्चे काढले. अनेक संघटनांनी आंदोलने केली.  जिल्हा आणि सत्र न्यायालयाने या आरोपींना कट रचून मुलीवर अत्याचार करणे, तिचा खून करणे, बालकांच्या लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार १८ नोव्हेंबरला २०१७ ला तिघांही आरोपींना दोषी ठरवून २९ नोव्हेबरला फाशीची शिक्षा ठोठावली. या खटल्यातील दोषी आरोपी नितीन गोपीनाथ भैलूम यांने औरंगाबाद उच्च न्यायालयातील हा खटला वर्ग करण्याची विनंती तत्कालीन मुख्य न्या. प्रदीप नंदराजोग यांनी मान्य करत खटला मुंबई उच्च न्यायालयात वर्ग केला.