जे जे मगदूम इंजिनियरिंगला स्वायत संस्थेचा दर्जा ; विजय मगदूम यांची माहिती

डॉ. जे. जे. मगदुम कॉलेजऑफ इंजीनियरिंग या महाविद्यालयाला स्वायत्त संस्थेचा दर्जा नुकताच दिला आहे. यूजीसीने महाविद्यालयाच्या सर्व सोई-सुविधा, पायाभूत सुविधा, अद्यावत प्रयोगशाळा, अनुभवी व पारंगत प्राध्यापक , संशोधन व अन्य बाबींचा विचार करुन शैक्षणिक वर्ष २०२४-२५ पासून स्वायत दर्जा लागू केला आहे

    जयसिंगपूर : डॉ. जे. जे. मगदुम कॉलेजऑफ इंजीनियरिंग या महाविद्यालयाला स्वायत्त संस्थेचा दर्जा नुकताच दिला आहे. यूजीसीने महाविद्यालयाच्या सर्व सोई-सुविधा, पायाभूत सुविधा, अद्यावत प्रयोगशाळा, अनुभवी व पारंगत प्राध्यापक , संशोधन व अन्य बाबींचा विचार करुन शैक्षणिक वर्ष २०२४-२५ पासून स्वायत दर्जा लागू केला आहे, तसेच प्रथम वर्ष व पदव्युत्तर पदवीचे प्रवेश राज्यच्या केंद्रीयभूत प्रवेश प्रक्रियेनुसारच होणार आहेत. हे महाविद्यालय शिवाजी विद्यापीठाशी संलग्नित असून, त्यांचेही या कामी मोलाचे सहकार्य व प्रोत्साहन मिळाले आहे, अशी माहिती पत्रकार परिषदेत संस्थेचे अध्यक्ष डॉ.विजय मगदूम व व्हाईस चेअरपर्सन डॉ. सोनाली मगदूम यांनी दिली.

    गेल्या ३१ वर्षा पासून उत्तम दर्जाचे व्यवसायिक शिक्षण देवून आजपर्यंत हजारो अभियंते घडवणाऱ्या  डॉ.जे.जे. मगदुम कॉलेज ऑफ इंजीनियरिंग या महाविद्यालयातील बहुसंख्य विद्यार्थी आज देश-विदेशात मोठ्या पदावर काम करत आहेत तर काहींनी आपला व्यवसाय सुरू केला आहे. महाविद्यालयास आएसओ सर्टिफिकेशन व NAACने  “A” ग्रेड  चे मानांकन दिले आहे.

    स्वायत्त दर्जाच्या अंतर्गत महाविद्यालयाने  स्वतंत्र अभ्यासक्रम,पारदर्शी परीक्षा पद्धती व गुणांकन पद्धती विकसित केली आहे. सध्याच्या औद्योगिक व्यवसायाचे मागणीनुसार अभियंते घडवणे व त्यांच्या उद्योजकीय अनुभवाकरिता महाविद्यालयाने ६० हून अधिक उद्योगाशी सामंजस्य करार केला आहे. त्यामुळे विविध कंपन्यांमध्ये विद्यार्थ्यांना इंटर्नशिप व नोकरीच्या संधी उपलब्ध होणार आहे. नामांकित शासकीय अथवा खाजगी महाविद्यालयामध्ये एक सेमिस्टर शिकण्याची संधी उपलब्ध होत आहे.  या स्वायत्त दर्जामुळे शासनाच्या आदेशानुसार नविन अभ्यासक्रम प्रणाली राबवणे सुलभ होणार आहे. या सर्वामुळे विद्यार्थ्यांना शिक्षणाची मोठी पर्वणी उपलब्ध होत आहे.महाविद्यालयात  सिव्हिल, ईटीसी, कॉम्प्युटर सायन्स इंजीनियरिंग, मेकॅनिकल इंजीनियरिंग, इनफर्मेशन टेक्नोलॉजी, आर्टिफिशियल इंटेलिजन्समध्ये बी. टेकची कोर्सेस तसेच एम.सी.ए.व सिव्हिल इंजीनियरिंगमध्ये एम. टेक. च्या ब्रँच उपलब्ध आहेत, अशीही माहिती कॅम्पस डायरेक्टर डॉ. सुनील आडमुठे यांनी दिली.सदर पत्रकार परिषदेस सल्लागार डॉ. उमेश देशन्नावर, प्राचार्या डॉ.शुभांगी पाटील, रजिस्ट्रार  साचिन जाधव , सर्व Dean, विभागप्रमुख आदी उपस्थित होते.