जळगावात प्रसाद लाड यांच्या प्रतिमेला जोडो मारो आंदोलन

आज जळगावमध्ये भाजपा आमदार प्रसाद लाड (Prasad Lad) यांच्या विरोधात आंदोलन करण्यात आलं. प्रसाद लाड यांच्या प्रतिमेला जोडो मारो आंदोलन करण्यात आले. यावेळी प्रसाद लाड, रावसाहेब दानवे यांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. तसेच यांच्या प्रतिमेला जोडे मारत काळे फासले.

    मुंबई : मागील काही दिवसांपासून छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल (Chhatrapati Shivaji Maharaj) वादग्रस्त वक्तव्यं केली जात आहेत. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी, सुधांशू त्रिवेदी, मंगलप्रभात लोढा, संजय गायकवाड, प्रसाद लाड (Koshyari, Mangalprabhat Lodha and Sanjay Gaikwad, Prasad lad) यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल (Chhatrapati Shivaji Maharaj) वादग्रस्त वक्तव्य केली आहेत. यानंतर आता केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा (Chhatrapati Shivaji Maharaj) एकेरी भाषेत उल्लेख केल्याचा व्हीडिओ व्हायरल होत आहे. यावर राज्यभरातून संतप्त प्रतिक्रिया येत असून, भाजपाच्या नेत्याविरोधात शिवप्रेमी तसेच विरोधक आंदोलन करत असून, यांच्यावर कारवाईची मागणी होत आहे.

    दरम्यान, आज जळगावमध्ये भाजपा आमदार प्रसाद लाड (Prasad Lad) यांच्या विरोधात आंदोलन करण्यात आलं. प्रसाद लाड यांच्या प्रतिमेला जोडो मारो आंदोलन करण्यात आले. यावेळी प्रसाद लाड, रावसाहेब दानवे यांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. तसेच यांच्या प्रतिमेला जोडे मारत काळे फासले. तसेच वादग्रस्त वक्तव्यं करणाऱ्या भाजपा नेत्यांविरोधात कारवाई व्हावी अशी मागणी यावेळी आंदोलकांनी केली.

    भाजपा नेत्यांची काय आहेत वादग्रस्त वक्तव्यं?

    राज्यपाल भगतसिंग कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांनी छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) हे जुन्या काळातील आदर्श होते. आताच्या काळातील आदर्श नितीन गडकरी आहेत असं वादग्रस्त वक्तव्य केलं. त्यानंतर भाजपाचे प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी देखील छत्रपती शिवाजी महाराजांनी पाच वेळा पत्र लिहून औरंगजेबची माफी मागितली होती, असं विधानं केलं. मंत्री मंगलप्रभात लोढा व संजय गायकवाड यांनी शिंदे गटाने केलेल्या बंडाची तुलना महाराजांच्या आग्रा सुटकेशी केली. भाजपा आमदार प्रसाद लाड यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा (Chhatrapati Shivaji Maharaj) जन्म शिवनेरीवर झाला नसून, कोकणात झाला आहे. आणि महाराजांचे बालपण रायगडावर गेले आहे असं म्हटलंय. यानंतर आता केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा (Chhatrapati Shivaji Maharaj) एकेरी भाषेत उल्लेख केल्याचा व्हीडिओ व्हायरल होत आहे. त्यामुळं  राज्यातील वातावरण तापले असून, भाजपाच्या विरोधात आंदोलन केलं जात आहे, तसेच राजकीय वर्तुळातून भाजपाच्या विरोधात संतप्त प्रतिक्रिया समोर येत आहेत.