बैलगाडा शर्यतीवर उद्या सर्वोच्च न्यायालयात तीन राज्यांची एकञित सुनावणी

शासनाने १५ जुलै २०११ च्या परीपत्रकानुसार बैलाचे वर्गीकरण जंगली प्राण्यांमध्ये केले आहे. शेकडो वर्षाची परंपरा असलेली गावा-गावातील यात्रा उरुस मधील आकर्षण म्हणजे बैलगाडी शर्यत. पण परिपत्रकामुळे राज्यातील बैलगाडी शर्यत पूर्ण बंद झाले आहेत.

    मुंबई : राज्यात बैलगाडी (Bullock Cart Race) शर्यतीवरील बंदी बाबत येत्या उद्या सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. या सुनावणीमध्ये काय होते याकडे शर्यत प्रेमी नागरिकांचे तसेच बैलगाडी धारकांचे लक्ष लागून राहिले आहे.

    ग्रामीण भागातील कष्टकरी शेतक-यांचा आवडता प्राणी म्हणजे ”बैल” वर्षभर शेतामध्ये बैलाच्या मदतीने शेतकरी मशागती करतो. पण शासनाने १५ जुलै २०११ च्या परीपत्रकानुसार बैलाचे वर्गीकरण जंगली प्राण्यांमध्ये केले आहे. शेकडो वर्षाची परंपरा असलेली गावा-गावातील यात्रा उरुस मधील आकर्षण म्हणजे बैलगाडी शर्यत. पण परिपत्रकामुळे राज्यातील बैलगाडी शर्यत पूर्ण बंद झाले आहेत.

    ग्रामीण भागातील शेतक-यांच्या या आवडत्या बैलगाडी शर्यत खेळाकडे लक्ष देवून बैलगाडी शर्यती चालू करण्यासाठी व बैलास जंगली यांच्या वर्गीकरणातून मुक्त करण्यासाठी शासन दरबारी प्रयत्न करावे अशी मागणी राज्यातील शेतकरी तसेच बैलगाडी संघटना मार्फत करण्यात आली होती.