पत्रकार सुशीलकुमार बाळकृष्ण कांबळे यांचे अल्पशा आजाराने निधन

वाई येथील नामांकित पत्रकार सुशीलकुमार बाळकृष्ण कांबळे (वय ४४)यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. गेली 25 वर्षे कांबळे पत्रकारितेत सक्रिय होते.साप्ताहिक तांबडी माती मधून त्यांनी पत्रकारितेची सुरुवात केली.त्यानंतर दै. ऐक्य,दै. तरुण भारत,या दैनिकामध्ये काम केल्यानंतर कांबळे यांनी दैनिक पुण्यनगरी मध्ये वाई तालुका प्रतिनिधी म्हणून 20 वर्षे काम पाहिले.

    बावधन : वाई येथील नामांकित पत्रकार सुशीलकुमार बाळकृष्ण कांबळे (वय ४४)यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. गेली 25 वर्षे कांबळे पत्रकारितेत सक्रिय होते.साप्ताहिक तांबडी मातीमधून त्यांनी पत्रकारितेची सुरुवात केली.त्यानंतर दै. ऐक्य,दै. तरुण भारत,या दैनिकामध्ये काम केल्यानंतर कांबळे यांनी दैनिक पुण्यनगरी मध्ये वाई तालुका प्रतिनिधी म्हणून 20 वर्षे काम पाहिले.मांढरदेव दुर्घटना,प्रतापगड आंदोलन,डॉ संतोष पोळ हत्याकांड या महत्वाच्या घटनेत कांबळे यांची पत्रकारिता बहरली.सध्या ते दैनिक नवराष्ट्र मध्ये वाई तालुका प्रतिनिधी म्हणून कार्यरत होते.

    वाई पत्रकार संस्थेच्या माध्यमातून त्यांनी सामाजिक क्षेत्रात योगदान दिले. अनेक सामाजिक संस्थाशी त्यांचा निकटचा संबंध होता.त्यांच्या पश्चात आई,पत्नी,एक मुलगी आणि मुलगा असा परिवार आहे.भुईंज चे माजी सरपंच कै. बाळकृष्ण कांबळे हे त्यांचे वडील होते.वाई अर्बन बँकेचे उपाध्यक्ष डॉ शेखर कांबळे हे त्यांचे बंधू होत.सुशील कांबळे यांच्यावर राजकीय,सामाजिक,शैक्षणिक,सहकार क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत सिद्धनाथ वाडी वाई येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.