‘ऊबरा माळढोक’ चा अबुधाबी ते पाकिस्तान प्रवास; अडकला मुणगे गावात, पुढील प्रवासासाठी राजस्थान सरकारकडे पत्रव्यवहार

मुणगे येथील माजी पंचायत समिती सदस्य संजीवनी बांबुळकर यांच्या घराजवळच्या बागेत गुरुवारी रात्री आठच्या सुमारास एक विदेशी पक्षी आढळून आला असून या पक्ष्यावर असलेल्या बिल्ल्यावरुन तो अबुधाबी येथून सोडण्यात आले असल्याचे वनविभागाकडून निदर्शनास आले आहे.

    देवगड : मुणगे गावामध्ये (Munge Village) सापडलेल्या अबुधाबी (Abu Dhabi) येथून आलेल्या पक्षाचे गुढ उलगडले असून पक्षी हा ऊबरा माळढोक (Houbara Bustard) या जातीचा असून प्रजनन कालावधीतील प्रवास समजण्यासाठी त्याच्या पायात रिंग अडकवून त्याला सोडण्यात आले. याबाबतची माहिती मानद वन्य जीव संरक्षक प्राध्यापक नागेश दप्तरदार (Honorary Wildlife Conservation Professor Nagesh Daptardar) यांनी दिली आहे. हा पक्षी अबुधाबीतून राजस्थानमार्गे पाकिस्तानला (Via Rajasthan To Pakistan) जात असून वाटेत तो मुणगे येथे थांबला असताना सापडला. याबाबत राजस्थान राज्य सरकारकडे पत्रव्यवहार करून या पक्षाला पुढील प्रवासासाठी सोडायचे का? याबाबत निर्णय घेतला जाणार आहे.

    मुणगे येथील माजी पंचायत समिती सदस्य संजीवनी बांबुळकर यांच्या घराजवळच्या बागेत गुरुवारी रात्री आठच्या सुमारास एक विदेशी पक्षी आढळून आला असून या पक्ष्यावर असलेल्या बिल्ल्यावरुन तो अबुधाबी येथून सोडण्यात आले असल्याचे वनविभागाकडून निदर्शनास आले आहे. हा पक्षी निदर्शनास येताच संजीवनी बांबूळकर यांनी वनविभागाशी संपर्क साधून वनपाल सादिक फकीर, वनरक्षक निलेश साठे यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. तो राखाडी रंगाचा विदेशी पक्षी ताब्यात घेतला; परंतु हा पक्षी त्याच्यावर असलेल्या बिल्ल्यावरून तो अबुधाबी येथून सोडलेला असल्याचे वन विभागाच्या निदर्शनास आले आहे.

    मानद जीवरक्षक प्राध्यापक नागेश दप्तरदार यांनी या संदर्भात बॉम्बे नॅशनल हिस्टरी ऑफ सोसायटीशी संपर्क साधून या संदर्भात चर्चा केली आहे. त्यामुळे येत्या दोन दिवसांत याबाबत अधिक माहिती उपलब्ध होणार असल्याचे वन विभागाकडून सागण्यात आले.