
कोचर दांपत्याला सीबीआयने २३ डिसेंबर रोजी रात्री उशिरा दिल्ली येथून अटक केल्यानंतर शनिवारी मुंबईतील विशेष न्यायालयाने त्यांच्या कोठडीत २९ डिसेंबरपर्यंत वाढ करण्यात आली होती. ती बुधवारी संपत असल्याने चंदा आणि त्यांचे पती दीपक कोचर तसेच वेणूगोपाल धूत यांना मुंबईतील विशेष सीबीआय न्यायालयात न्यायधीश ए. सय्यद यांच्यासमोर हजर करण्यात आले.
मुंबई:आयसीआयसीआय बँकेच्या (ICICI Bank) माजी मुख्य कार्यकारी अधिकारी चंदा कोचर (Chanda Kochar) आणि त्यांचे पती दीपक कोचर (Dipak Kochar) तसेच वेणूगोपाल धूत (Venugopal Dhut) यांना गुरुवारी विशेष सीबीआय न्यायालयाने १० जानेवारीपर्यंत न्यायालयीन कोठडी (Judicial Custody) सुनावणी आहे.
कोचर दांपत्याला सीबीआयने २३ डिसेंबर रोजी रात्री उशिरा दिल्ली येथून अटक केल्यानंतर शनिवारी मुंबईतील विशेष न्यायालयाने त्यांच्या कोठडीत २९ डिसेंबरपर्यंत वाढ करण्यात आली होती. ती बुधवारी संपत असल्याने चंदा आणि त्यांचे पती दीपक कोचर तसेच वेणूगोपाल धूत यांना मुंबईतील विशेष सीबीआय न्यायालयात न्यायधीश ए. सय्यद यांच्यासमोर हजर करण्यात आले. तेव्हा, तिन्ही आरोपींच्या चौकशीसाठी अधिक कोठडीची आवश्यकता नसल्याचे सीबीआयच्यावतीने न्यायालयाला कळविण्यात आले. तसेच तिघांचीही न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात यावी, असेही स्पष्ट केले त्याची दखल घेत न्यायालयाने कोचर दांपत्य आणि धूत यांची १४ दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत रवानगी केली.
आयसीआयसीआय बँकेच्या व्यवस्थाकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी असताना चंदा कोचर आयसीआयसीआय बँकेने व्हिडीओकॉनला दिलेल्या सहा कर्जासंदर्भात २०१९ मध्ये नोंदवण्यात आला त्यानंतर कोचर दाम्पत्याला अटक करण्यात आली आहे. या कर्जांमुळे बँकेचे १,८७५ कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा सीबीआयचा दावा आहे.
चंदा कोचर यांनी वैयक्तिक हितासाठी पदाचा दुरूपयोग करून व्हिडीओकॉनला ३,२५० कोटी रुपयांचे कर्ज दिले. धूत व चंदा कोचर यांचे पती दीपक यांनी एकत्र येऊन न्यूपॉवर रिन्यूएबल ही कंपनी स्थापन करून कंपनीच्या नावावर ६४ कोटी रुपयांचे कर्ज घेतले. तसेच व्हिडीओकॉन समूहाच्या पाच कंपन्यांच्या नावावर तीन हजार २५० कोटी रुपयांचे कर्ज घेण्यात आले होते. मात्र ८६ टक्के रक्कम म्हणजेच २,८१० कोटी रुपयांची परतफेड करण्यात आलेली नाही, असा आरोपही सीबीआयने केला आहे.