ज्योती मांढरे अडचणीत येण्याची शक्यता ; धोम हत्याकांडातील मास्टर माईंड जेलमध्ये बसून करतोय केस स्टडी

धोम हत्याकांडातील मास्टर माईंड संतोष पोळ जेलमध्ये बसून केस स्टडी करत आहे. त्याने काढलेल्या मुद्द्यांमुळे माफीची साक्षीदार असलेली ज्योती मांढरे अडचणीत येण्याची शक्यता आहे. आजच्या उलट तपासात ज्योतीचे वडील पांडुरंग मांढरे यांनी खून झालेल्या व्यक्तीचे मोबाईल परगावी नेऊन वापरल्याचे उजेडात आले आहे.

    वाई : धोम हत्याकांडातील मास्टर माईंड संतोष पोळ जेलमध्ये बसून केस स्टडी करत आहे. त्याने काढलेल्या मुद्द्यांमुळे माफीची साक्षीदार असलेली ज्योती मांढरे अडचणीत येण्याची शक्यता आहे. आजच्या उलट तपासात ज्योतीचे वडील पांडुरंग मांढरे यांनी खून झालेल्या व्यक्तीचे मोबाईल परगावी नेऊन वापरल्याचे उजेडात आले आहे. वाई धोम हत्याकांडातील प्रमुख आरोपी असलेल्या संतोष पोळ प्रकरणात सध्या माफीची साक्षीदार झालेल्या ज्योती मांढरेचा उलट तपास सुरू आहे.आरोपींच्या वतीने अॅड. दिनेश धुमाळ यांनी ज्योतीला अनेक उलट सुलट प्रश्न विचारले. नथमल भंडारी, सलमा शेख, मंगल जेधे यांच्या खुनामध्ये ज्योतीचे वडील पांडुरंग मांढरे, संजय डंब, स्वाती डंब, कैलास चुनाडे यांचा संबंध असल्याबाबतचे प्रश्न उलट-सुलट पद्धतीने पुन्हा पुन्हा विचारण्यात आले. वकिलांनी ज्योतीला तू व तुझे वडील कोल्हापूरला का गेला होता, असे विचारले. त्यावर ज्योतीने माझ्या कामासाठी गेले होते असे पहिल्यांदा सांगितले तर हाच प्रश्न फिरवून विचारला असता तिने मंगल जेधे यांच्या कामासाठी गेल्याचे सांगितले.

    वडिलांचा नेमका काय संबंध ?
    कोल्हापूर येथे जाऊन पांडुरंग मांढरे यांनी सलमा शेख, नथमल भंडारी व मंगल जेधे यांच्या फोनचा वापर केल्याचे ज्योतीने कबूल केले. हा मुद्दा पहिल्यांदाच न्यायालयासमोर आला आहे. यामुळे या प्रकरणात तिच्या वडिलांचा नेमका काय संबंध आहे?  हे औत्सुक्याचे ठरणार आहे. आरोपीच्या वतीने अॅड. दिनेश धुमाळ कामपाहत आहेत.

    पिशवीमध्ये संपूर्ण केसची कागदपत्रे
    संतोष पोळ हा अतिशय चाणाक्ष असून तो जेलमध्ये बसून संपूर्ण केसचा स्टडी करीत असतो. कोर्टात येताना एका पिशवीमध्ये संपूर्ण केसचे कागदपत्रे तो सोबत आणतो. साक्षीदारांना प्रश्न विचारले जात असताना अनेक मुद्दे तो वकिलांच्या लक्षात आणून देत असल्याचे आज पाहावयास मिळाले.