के. एम. शुगर साखर कारखाना पडळ शेतकऱ्यांच्या उसास उच्चांकी दर देण्याचा प्रयत्न करेल -प्रभाकर घार्गे

यावर्षी पावसाने ताण दिल्यामुळे ऊस उत्पादनावर परिणाम होईल ही शेतकऱ्यांमध्ये तसेच साखर कारखानदारांमध्ये भीती होती. मात्र श्रीगणेशाच्या कृपेने खटाव-माण तालुक्यात गेल्या पाच सहा दिवसांमध्ये सर्वत्र समाधानकारक पाऊस पडत असल्यामुळे यावर्षी ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी सुस्कारा सोडला असून त्यामुळे त्यांच्यामध्ये समाधानाचे वातावरण आहे.

    मायणी : यावर्षी पावसाने ताण दिल्यामुळे ऊस उत्पादनावर परिणाम होईल ही शेतकऱ्यांमध्ये तसेच साखर कारखानदारांमध्ये भीती होती. मात्र श्रीगणेशाच्या कृपेने खटाव-माण तालुक्यात गेल्या पाच सहा दिवसांमध्ये सर्वत्र समाधानकारक पाऊस पडत असल्यामुळे यावर्षी ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी सुस्कारा सोडला असून त्यामुळे त्यांच्यामध्ये समाधानाचे वातावरण आहे. यावर्षी आपण डिस्टिलरी प्रकल्प सुरू करत असून त्यामुळे कारखान्याच्या उत्पन्नात वाढ होणार असल्याने यावर्षी ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या उसास के.एम. शुगर कारखान्याच्या वतीने उच्चांकी दर देण्याचा निश्चित प्रयत्न केला जाईल असे प्रतिपादन खटाव-माण तालुका ऍग्रो प्रोसेसिंग प्रा लिमिटेड, पडळ ता. खटाव या कारखान्याचे चेअरमन व माजी आमदार प्रभाकर घार्गे यांनी केले.

    खटाव-माण तालुका अॅग्रो प्रोसेसिंग प्रा. लि.पडळ साखर कारखान्याचा पाचवा गळीत हंगाम शुभारंभ, बॉयलर अग्निप्रदीपन व झिरो मिल रोलर पूजन समारंभ कारखाना स्थळावर आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते. यावेळी कारखान्याचे को-चेअरमन मनोज दादा घोरपडे, कार्यकारी संचालक संग्राम बापू घोरपडे, संचालक कु. प्रीती घार्गे, विक्रम घोरपडे ,कृष्णात शेडगे, महेश घार्गे उपस्थित होते.

    कारखान्याचे को चेअरमन मनोज दादा घोरपडे म्हणाले यावर्षी झिरो मिल रोलर बसविल्याने नेहमीपेक्षा जादा वेगाने केले जाईल तसेच डिस्टिलरी साखर व पूजन सुरू असून अत्यंत गरजेच्या महत्त्वाकांक्षी 120 स्केल पिढीचा इथेनॉल प्रकल्प या हंगामात सुरू होत आहे त्यामुळे कारखान्याच्या उत्पन्न वाढण्यास मदत होणार आहे आज पर्यंत कारखान्याने वाहतूकदार कामगार ऊस उत्पादक शेतकरी या सर्वांचे देणे वेळेत दिल्यामुळे यावर्षीही ही परंपरा अखंडितपणे सुरू ठेवली जाईल वेळेत पैसे देणारा कारखाना अशी या कारखान्याची सर्व शेतकऱ्यांना माहिती झाल्यामुळे प्रतिवर्षी मोठ्या प्रमाणात शेतकरी या कारखान्यात ऊस घालत असल्याने सातत्याने कारखान्याच्या साखर उत्पादनात वाढ होत आहे ही समाधानाची बाब आहे

    कारखान्याचे संचालक विक्रम घोरपडे यावेळी म्हणाले, प्रतिवर्षी शेतकरी संघटनांच्या माध्यमातून उसाच्या दरासंदर्भात आंदोलने केली जातात .मात्र परिसरातील इतर कारखान्यांची देणी तशीच असताना , उसाचा दर आमचा उत्तम असताना देखील या कारखान्यास त्रास देण्याचा प्रयत्न करीत आहेत ही बाब निश्चितच क्लेशदायक आहे. आमच्या कारखान्याने आजपर्यंत कोणाही सभासद शेतकऱ्यांचे वाहतूकदारांचे व कामगारांचे वेतन थकीत ठेवले नाही .यासंदर्भात शेतकरी संघटनेने खात्री करून घ्यावी व अत्यंत शिस्तीत व चांगल्या पद्धतीने चाललेल्या कारखान्यास नाहक त्रास देण्याचा प्रयत्न करू नये.

    सदर कार्यक्रमास इंदिरा घार्गे, प्रकाश घार्गे ,माजी जि .प. सदस्या मंगल घोरपडे,  समता घोरपडे , तेजस्विनी घोरपडे, रीना घोरपडे,  मनीषा शेडगे,जनरल मॅनेजर अशोक नलवडे, कारखान्याचे सर्व संचालक ,अधिकारी व कामगार वर्ग व परिसरातील शेतकरी व सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.