माणदेशी चॅम्पियन्सची काजल आटपाडकर हिची महिला हॉकी संघात निवड

माण देशी चॅम्पियन्सची खेळाडू अश्विनी कोळेकर (Ashwini Kolekar) हिची बचावपटू म्हणून तर काजल आटपाडकर (Kajal Atpadkar) हिला फॉरवर्ड खेळाडू म्हणून निवड करण्यात आली आहे.

    म्हसवड : आयर्लंडमधील डब्लिन येथे होणाऱ्या अंडर २३ या गटात पाच राष्ट्राच्या स्पर्धेसाठी ज्युनिअर महिला हॉकी टीमची घोषणा भारतीय हॉकी संघाकडून करण्यात आली. यामध्ये २० खेळाडूंची निवड करण्यात आली असून, माणदेशी चॅम्पियन्सची खेळाडू अश्विनी कोळेकर (Ashwini Kolekar) हिची बचावपटू म्हणून तर काजल आटपाडकर (Kajal Atpadkar) हिला फॉरवर्ड खेळाडू म्हणून निवड करण्यात आली आहे.

    या स्पर्धेदरम्यान ज्युनिअर महिला हॉकी संघ नेदरलँड, आयर्लंड, यूएसए आणि युक्रेन यांच्याविरुद्ध खेळणार आहेत. या स्पर्धा १९ जून ते २६ जून या दरम्यान नेदरलँड येथे होणार आहेत. या निवडीमुळे माणदेशी दोन महिला खेळाडू भारतीय ज्युनिअर महिला हॉकी संघाचे प्रतिनिधत्व करणार आहेत आणि याचा आम्हाला अभिमान वाटतो, असे माण देशी चॅम्पियन्सचे अध्यक्ष प्रभात सिन्हा यांनी सांगितले.

    तसेच त्यांनी माण देशी चॅम्पियन्सचे कोचेस श्रीराम बाबर, धूळा कोळेकर, कोंडीबा विरकार, महालीग खांडेकर, अक्षय दीडवाघ व सूरज काटकर यांचेही अभिनंदन केले.