
खडकपाडा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक शरद झिने यांनी दिली आहे. मात्र या घटनेमुळे कल्याण मध्ये एकच खळबळ उडाली आहे. डोंबिवली पूर्वेतील माणगाव येथील म्हात्रे चाळीत एक धक्कादायक घटना घडली आहे. या ठिकाणी रविवारी मनोज कुमार अग्रहरी या ३८ वर्षीय बापाने आपल्या नववर्षीय गतिमंद मुलीची गळा दाबून हत्या केल्याची माहिती समोर आली आहे.
कल्याण : कल्याण आणि डोंबिवलीत दोन हत्येच्या घटना घडल्यामुळे एकच खळबळ सुरु झाली आहे. कल्याण पश्चिमेत एका ट्रक चालकाची धारदार शस्त्राने हत्या करण्यात आली आहे. तर डोंबिवलीत एका नऊ वर्षीय गतिमंद मुलीची बापाने हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
कल्याण पश्चिमेतील दुर्गाडी चौकात सोमवारी पहाटे एका ट्रक चालकाची निर्घृणपणे हत्या केल्याची माहिती समोर आली आहे. भोला कुमार महतो असे ट्रक चालकाचे नाव आहे. मयत भोलाचा मृतदेह शव विच्छेदनाला पाठवून खडकपाडा पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे. नक्की ही हत्या कोणी केली आहे. या हत्या मागचे कारण काय आहे याच्या तपास आता खडकपाडा पोलिसांनी तपास सुरू केला आहे. अशी माहिती खडकपाडा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक शरद झिने यांनी दिली आहे. मात्र या घटनेमुळे कल्याण मध्ये एकच खळबळ उडाली आहे.
दुसरी घटना – डोंबिवली पूर्वेतील माणगाव येथील म्हात्रे चाळीत एक धक्कादायक घटना घडली आहे. या ठिकाणी रविवारी मनोज कुमार अग्रहरी या ३८ वर्षीय बापाने आपल्या नववर्षीय गतिमंद मुलीची गळा दाबून हत्या केल्याची माहिती समोर आली आहे. मनोज कुमार अग्रहरी याला चार मुली आहेत. पत्नी लिलावती देखील काम करते. मनोज कुमार हा बिगारीचे काम करतो. त्याला दारूची लत आहे. रात्री जेव्हा पत्नी घरी आली तेव्हा त्याच्या पत्नीला या घटनेची माहिती मिळाली. हत्या केल्याची तक्रार मुलीच्या आईने मानपाडा पोलीस ठाण्यात केली. मानपाडा पोलिसांनी घटनेच्या तपास करीत मनोज कुमार अग्रहरीला अटक केली आहे. मुलीच्या आजाराला कंटाळून मनोज कुमार याने मुलीची हत्या केल्याची कबुली मनोज कुमार याने दिली आहे. अशी माहिती मानपाडा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश मदने यांनी दिली आहे.