खोणी – तळोजा मार्गावर वाहन चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रक कोसळला नदीत, वाहन चालक जखमी

ट्रक मध्ये अडकलेल्या चालकाला गंभीर जखमी अवस्थेत बाहेर काढत स्थानिक रुग्णालयामध्ये दाखल केले आहे.

    कल्याण-डोंबिवली : नुकतीच एक बातमी खोणी – तळोजा महामार्गावरील आली आहे. आज सकाळी डोंबिवली खोणी तळोजा महामार्गावर चार वाजेच्या सुमारास मालवाहतूक करणाऱ्या एका ट्रकच्या चालकाचे नियंत्रण सुटल्याने हायवेवरील ब्रिजचा कठडा तोडून ट्रक २५ ते ३० फूट उंचीवरून नदीत कोसळल्याची घटना घडली आहे. ट्रक खाली पडताना काही प्रवाशांनी पाहिले असता रस्त्यावरती जाणाऱ्या प्रवासी व स्थानिक गावकऱ्यांनी शर्तीचे प्रयत्न करत ट्रक मध्ये अडकलेल्या चालकाला गंभीर जखमी अवस्थेत बाहेर काढत स्थानिक रुग्णालयामध्ये दाखल केले आहे.

    या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल होत कंटेनरच्या साहाय्याने ट्रकला बाहेर काढण्याचे शर्तीचे प्रयत्न सुरू केले आहे. ट्रक चालकाचा वाहन चालक जखमी अवस्थेत असल्यामुळे त्या वाहन चालकाला लगेचच रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले. हायवेवरील ब्रिजचा कठडा तुटला आहे आणि या नदीमध्ये पाणी कमी असल्यामुळे या ट्रकच्या व्हिडिओमध्ये या ट्रक लगेचच दिसून येत आहे. या ट्रक नदीमध्ये बाहेर काढण्याचे नोकऱ्या युद्धपातळीवर सुरु आहे.