डोंबिवलीतील काेपरमधील धोकादायक इमारतीचा भाग कोसळला, आठ कुटूंबियांना काढले घराबाहेर, महापालिकेचा ढिम्म कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर

डोंबिवली पूर्व भागात आदिनाथ ही धोकादायक इमारत पडली होती. या इमारतीत राहणाऱ्या तीन जणांचा मृत्यू झाला होता. ही इमारत खाली करण्याची प्रक्रिया सुरु होती.

    डोंबिवली : डोंबिवली कोपर परिसरातील लक्ष्मण पावशे या धाेकादायक इमारतीचा काही भाग आज कोळल्याची घटना घडली आहे. या इमारती राहणाऱ्या आठ कुटुंबियांना घराबाहेर काढण्यात आले आहे. त्यांना वेळीच घराबाहेर काढले नसते तर त्यांच्या जीवाला धोका झाला असता. या घटनेमुळे महापालिकेचा ढिम्म कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे.

    काही दिवसांपूर्वीच डोंबिवली पूर्व भागात आदिनाथ ही धोकादायक इमारत पडली होती. या इमारतीत राहणाऱ्या तीन जणांचा मृत्यू झाला होता. ही इमारत खाली करण्याची प्रक्रिया सुरु होती. या इमारतीचा भिंतीची माती सिमेट रात्रीपासून पडायला सुरु झाले होते. या इमारतीच्या दुर्घटनेमध्ये तीन जणांचा मृत्यू झाला आहे. तरी देखील या रहिवाश्यांना महापाालिकेकडून भोगवाटा प्रमाणपत्र दिलेले नाही अशी माहिती समोर आली आहे.

    आदिनाथ दुर्घटनेनंतर आयुक्तांनी पोलीस बळाचा वापर करुन धोकादायक इमारत खाली करुन त्या पाडण्याची कारवाई केली जाईल. मात्र आयुक्त वैयक्तिक कारणासाठी रजेवर आहेत. त्याचा अतिरिक्त पदभार हा जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांच्याकडे आहे. ते केवळ अनंत चतुर्थीच्या आदल्या दिवशी विसर्जनाची पाहणी करण्यासाठी आले होते. त्यांनी बैठक घेतली. त्यानंतर ते काही आले नाहीत.

    अनेक धोकादायक इमारतीत भाडेकरु असतात. त्यांचा जागा मालकाशी वाद असतो. जागा मालक इमारत धोकादायक ठरवून भाडेकरुना बाहेर काढण्याच्या बेतात असतो. तर भाडोत्री घर सोडू इच्छीत नाहीत. तसेच महापालिकेकडून त्यांचे पुनर्वसन केले जात नाही. या सगळ्या पार्श्वभूमीवर धोकादायक इमारतीचे भाग कोसळून दुर्घटनेत आणखीन काही रहिवासी मृत्यूमुखी पडू शकतात. काही राजकीय मंडळी या धोकादायक इमारती वाचविण्याचा प्रयत्न करतात. त्यातूनही ही परिस्थिती भद्धवली असल्याचे सांगण्यात येत आहे.