
मुक्ताईनगर येथे राहणाऱ्या पूजा रक्षाबंधनासाठी मुक्ताईनगरहुन आपल्या पतीसोबत डोंबिवलीला आपल्या नंदेकडे आली होती.
डोंबिवली : इमारतीवरून उडी मारून विवाहितेने आत्महत्या केल्याचे घटना शुक्रवारी सकाळच्या सुमारास डोंबिवली पूर्वेतील अजडेपाडा परिसरात घडली आहे. पूजा सोळंके असं महिलेचे नाव असून इमारतीच्या चौथ्या मजल्यावर उडी मारून तिने आत्महत्या केली. मुक्ताईनगर येथे राहणाऱ्या पूजा रक्षाबंधनासाठी मुक्ताईनगरहुन आपल्या पतीसोबत डोंबिवलीला आपल्या नंदेकडे आली होती. नंदेच्या घरी राहत असताना सकाळी पतीसोबत वाद झाला. या वादाच्या कारणावरून आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
मुक्ताईनगर येथे पूजा सोळंके ही आपल्या पतीसह राहत होती. आठ महिन्यापूर्वी तिचे लग्न झाले होते. पूजा रक्षा बंधनानिमित्त डोंबिवली पूर्वेतील आजदेपाडा परिसरात राहणाऱ्या आपल्या नणंदकडे आपली पतीसह आली होती. सकाळच्या सुमारास पूजाचे तिच्या पतीसोबत काही कारणावरून भांडण झाले. त्यामुळे संतापलेल्याला पूजाने इमारतीच्या चौथा मजल्यावर उडी मारून आत्महत्या केली. घटनेची माहिती मिळताच मानपाडा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली या घटनेची नोंद केली असून पोलीस पुढील तपास करत आहेत.