बल्याणी प्रभागात मुलभूत १ कोटीच्या सुविधा कामाचा शुभारंभ

२०१५ मध्ये प्राकलन बनविले होते. ते कोविड काळानंतर काही कामे मंजूर झाली. मनपा कडून निधीची कमतरता पडत असल्याने स्थानिक आमदार विश्वनाथ भोईर यांचे विशेष प्रेम या प्रभागावर असल्याने दर महिन्याला १ कोटीच्या कामाचे उदाघाटन होत आहे.

    कल्याण : कल्याण डोंबिवली क्षेत्रातील ग्रामीण ‘अ’ प्रभागक्षेत्रातील बल्याणी प्रभाग क्रं ११ हा अविकसित, मुलभूत सुविधा, पायाभूत सुविधाची कमतरता असलेल्या प्रभागात माजी नगरसेवक कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक मयूर पाटील, माजी शिक्षणमंडळ सभापती नमिता मयूर पाटील या दांपत्याने प्रभागाचा सार्वत्रिक विकास हाच ध्यास धरीत विकास कामे मार्गी लावत प्रभागाचा कायापालट करण्यासाठी सतत पाठपुरावा करीत असतात. त्या अनुषंगाने कल्याण पश्चिमचे आमदार विश्वनाथ भोईर यांनी सुमारे १ कोटी निधी मुलभूत सुविधा कामासाठी उपलब्ध करून दिला.

    मनपा क्षेत्रातील भौगोलिक दृष्ट्या सर्वात मोठे क्षेत्र रचना असून तिपन्ना नगर, एन आर सी काँलनी, मोहेली, उंभर्णी ,बल्याणी, इंदिरा नगर असा बहुसंख्य ग्रामीण, तसेच स्लँम् परिसर असून या प्रभागात मूलभूत पायाभूत सुविधाची कमतरता मनपा स्थापनेपासून या गावाच्या विकाससाठी भरीव कामगिरी मनपा प्रशासनाकडून झाली नसल्याने माजी नगरसेवक मयूर पाटील, माजी नगरसेविका नमिता पाटील दांपत्याने प्रभागाचा कायापालट करण्याचा झापटा लावला आहे. कोवीड काळात लालफितीत अडकलेल्या फाईल मार्गी लावित रस्ते, गटारे, पायावाटा, पथदिवे, पाणी पुरवठा वितरण वाहिन्या साठी प्रशासन आणि आमदार विश्वनाथ भोईर यांच्या निधीतून तब्बल २५ कोटीहून अधिक निधीच्या माध्यमातून प्रभागातील मनपाच्या शाळा, इमारत, रस्ते, पायवाटा, पथदिवे, गटारे, नाले आदि मुलभूत सुविधा साठी प्रयत्न केले. बल्याणी प्रभागाचा कायापालट करण्याच्या उद्देशाने बुधवारी प्रभाग क्र. ११ बल्याणी प्रभागात कल्याण पश्चिमचे आमदार विश्वनाथ भोईर यांच्या विकासनिधीतून व स्थानिक माजी नगरसेवक मयूर सुरेश पाटील यांच्या पाठपुराव्याने वचनपूर्ती व विकासकामांचा शुभारंभ करण्यात आला. यामध्ये बल्याणी गाव परिसरातील मेन रस्ता ते फक्रू गुजर याच्या घरापर्यंत सी.सी. रस्ता बनविणे १५ लक्ष बल्याणी मस्जिद ते तलाव सी.सी. रस्ता तयार करणे – २० लक्ष वैष्णवी माता मंदिर ते इंदिरानगर पाईप लाइन टाकणे (८ इंची पाणी पुरवठा वितरण वाहिन्या) ४० लक्ष सावळाराम पाटील नगर (बल्याणी टेकडी) पाण्याच्या टाकी परिसरात सी.सी. रस्ता तयार करणे – २५ लक्ष संदर्भीत विकास कामाचा शुभारंभ कल्याण पश्चिमचे आमदार विश्वनाथ भोईर यांच्या हस्ते संपन्न झाला.

    या प्रसंगी पत्रकारांशी संवाद साधताना माजी नगरसेवक मयूर पाटील यांनी सांगितले की, माझ्या प्रभागात मनपाचे दुर्लक्ष असून “अ” प्रभागावर ,बल्याणी प्रभागावर सावत्र मुलासारखी वागणूक दिली गेली. २०१५ मध्ये प्राकलन बनविले होते. ते कोविड काळानंतर काही कामे मंजूर झाली. मनपा कडून निधीची कमतरता पडत असल्याने स्थानिक आमदार विश्वनाथ भोईर यांचे विशेष प्रेम या प्रभागावर असल्याने दर महिन्याला १ कोटीच्या कामाचे उदाघाटन होत आहे. मी मनापासून कल्याण पश्चिमेचे आमदार विश्वनाथ भोईर यांचे आभार यानिमित्ताने मानत आहे.

    प्र क्रं ११ बल्याणी प्रभागात माजी नगरसेवक मयूर पाटील, माजी नगरसेविका नमिता पाटील यांच्या मागणीनुसार १ कोटीचा निधी दिला आहे. इंदिरा नगर परिसरासाठी ४० लक्ष निधी देऊन पिण्याच्या पाण्याच्या वितरण वाहिन्या टाकण्यात येणार आहेत. ते कुठुन पाणी भरत होते. त्या़चा प्रश्न गंभीर होता. तो आता मार्गी लागणार आहे. बल्याणी टेकडी परिसर रस्त्यासाठी, २० लक्ष दर्गा परिसर रस्त्यासाठी २५ लक्ष बल्याणी गाव रस्त्याचे सी सी करण करणे १५ लक्ष असा सुमारे १ कोटी रू निधी उपलब्ध करून दिला आहे.

    कल्याण पूर्वेत सेना भाजपा वाद दिसून येत आहे गद्दारांकडे पैसे आले आहेत. यासंदर्भात त्या आमदारांना काय सल्ला देणार प्रसिध्दी माध्यांमानी विचारलेल्या प्रश्नावर आमदार विश्वनाथ भोईर म्हणाले की, ज्यांची त्यांची विचार करण्याची पध्दत, कुवत असते. मा.एकनाथ शिंदे साहेबांनी उठाव केला त्यांच्या नंतर आम्ही त्याच्या बरोबर गेलो. श्रीकांत शिंदे त्यांचे पुत्र आहेत. त्यांच्या बद्दल असे बोलणे म्हणजे आमच्या सर्वाबद्दल असे बोलणे आहे. गणपतशेठ गायकवाड यांनी भान राखून बोलावे, आपण युतीमध्ये आहोत. युतीत असे वक्तव्य नसावे अशी माझी स्वतः ची प्रामाणिक इच्छा आहे असा टोला लागविला त्यांनी लगावला. या प्रसंगी शिवसेना शिंदे गटाचे पदाधिकारी, अंकुश जोगदंड, रोहन कोट,शिवाजी गोधंळे, चेतन कांबरे, राजेश पाटील ,महेश पाटील , तसेच देवा गोधंळे, सूरज पावशे आदी मान्यवर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थितीत होते.