कल्याण-डोंबिवली महापालिका आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांगडे यांची स्वच्छता मोहीम, स्वच्छतेची सुरुवात स्वतः पासुनच करुया, स्वच्छतेचे महत्व मनावर बिंबवूया!

आपण स्वच्छता केली तर शहर स्वच्छ राहिल, यासाठी आपण सर्वांनी या मोहिमेत सक्रीय सहभाग घ्यावा असे आवाहन आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांगडे यांनी यावेळी केले.

    कल्याण : स्वच्छतेची सुरुवात स्वतः पासुनच करुया, स्वच्छतेचे महत्त्व मनावर बिंबवूया! असे उद्गार महापालिका आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांगडे यांनी रविवारी काढले. स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत इंडियन स्वच्छता लिग २.० या अभियानात दुगार्डी गणेश घाट परिसर येथे आयोजित केलेल्या स्वच्छता मोहिमे विषयी बोलतांना त्यांनी हे उद्गार काढले. आपण स्वच्छता केली तर शहर स्वच्छ राहिल, यासाठी आपण सर्वांनी या मोहिमेत सक्रीय सहभाग घ्यावा असे आवाहन आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांगडे यांनी यावेळी केले.

    इंडियन स्वच्छता लीग मध्ये देशातील अनेक शहरे सहभागी होणार आहेत. या स्पर्धेमध्ये जे शहर अधिक चांगलं काम करणार आहे. त्या शहराला पुरस्कार देऊन गौरव करण्यात येणार आहे त्या दृष्टीकोनातून कल्याण डोंबिवली परिक्षेत्रातील जास्तीत जास्त नागरिकांनी स्वच्छता लीग मध्ये सहभागी व्हावे आणि स्वच्छतेबाबत जास्तीत जास्त जनजागृती निर्माण करावी असे आवाहन महापालिका आयुक्त डॉ.भाऊसाहेब दांगडे यांनी केले.

    या समयी महापालिकेचे स्वच्छ भारत अभियानाचे ब्रँड अँम्बेसेडर डॉ. प्रशांत पाटील, रुपिंदर कौर, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपआयुक्त अतुल पाटील, माहिती व जनसपंर्क विभागप्रमुख संजय जाधव, शिक्षण विस्तार अधिकारी विजय सरकटे, माहिती व जनसपंर्क अधिकारी माधवी पोफळे, सहा. आयुक्त राजेश सावंत, प्रिती गाडे, सुषमा मांडगे, मुख्य स्वच्छता अधिकारी वसंत देगलुरकर, शालेय विदयार्थी, अनेक सामाजिक संस्थाचे प्रतिनिधी व इतर मान्यवर उपस्थित होते. यावेळी स्वच्छतेबाबत तसेच माझी वसुंधराबाबत शपथ ग्रहण करण्यात आली त्याचप्रमाणे शाळा क्र. ३८ च्या विदयार्थ्यांनी स्वच्छतेबाबत बहारदार पथनाटयाचे सादरीकरण केले. हे स्वच्छता अभियान आज दुर्गाडी किल्ला परिसर, गणेश घाट तसेच डोंबिवली पश्चिम येथील रेती बंदर परिसर आणि डोंबिवली पुर्व येथील ह.भ.प.सावळाराम महाराज म्हात्रे क्रिडा संकुल येथे ही राबविण्यात आले.