केडीएमसी एएसआय कर्मचाऱ्यांचे इन्क्रिमेंट थांबवले, म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेना आक्रमक

मनसेचे कल्याण जिल्हाध्यक्ष उल्हास भोईर यांनी एएसआय कर्मचाऱ्यांसोबत केडीएमसी उपायुक्त अतुल पाटील यांची भेट घेतली.

    कल्याण : कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतील एएसआई कर्मचाऱ्यांचे इन्क्रिमेंट थांबवण्यात आले आहे. कर्मचारी व्यवस्थित काम करत नाही म्हणून ही कारवाई करण्यात आली आहे असं महापालिका प्रशासनाच्याचे म्हणणे आहे तर महापालिकेच्या या कारवाई विरोधात मनसे आणि महापालिका कामगार संघटना आक्रमक झाली आहे. केडीएमसीतील ५० एएसआई कर्मचाऱ्यांचे इन्क्रिमेंट महापालिकाकडून थांबवल्यानंतर वातावरण तापले आहे. अतुल पाटील यांच्यावर आयुक्तांनी कारवाई करावी नाहीतर आंदोलनाबाबत म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेचे अध्यक्ष बाळ हरदास यांनी सांगितले की, कामगार अत्यंत कमी आहेत. जे स्वच्छता अधिकारी आहेत ते मन लावून काम करतात पण कामगारांचे बळ कमी असल्यामुळे काही काही प्रश्न येतात परंतु अतुल पाटील हे अत्यंत बेजबाबदारपणे वागत आहेत. त्यांच्या मर्जीतला एक स्वच्छता अधिकारी जो व्यवस्थित काम करत नाही खूप काही गोष्टी आहेत. परंतु आज मी बोलत नाहीत. कारण मला महानगरपालिकेची आणि प्रशासनाची बदनामी करायची नाही.

    परंतु त्याला आम्ही बदली करायला लावले त्याचा एक राग म्हणून तो आता आमचे पदाधिकारी आहेत किंवा मेंबर साहेब त्या स्वच्छता अधिकाऱ्यांवर हेतू पुरस्कार कारवाई करतात त्याच्या बाबतीत आम्ही शांतपणे पत्र दिले. याबाबत आयुक्तांची चर्चा करून आम्ही प्रश्न सोडवायचा प्रयत्न करू. पण त्यांनी एक महिन्यानंतर जी बदनामी जी केलेली आहे आणि इतकं नव्हे तर मीटिंग जेव्हा घेतल्या जातात तेव्हा स्वच्छता अधिकाऱ्यांना अत्यंत अपमानास्पद वागणूक मिळते आणि त्यांचं मन धैर्य खच्चीकरण होते. आयुक्तांना आम्ही पत्र देतोय की आयुक्तांनी याच्या बाबतीत गंभीर दखल घ्यावी या एकाच अधिकाऱ्यांच्या विरुद्ध आहे आम्ही प्रशासनाच्या विरुद्ध नाही त्यांनी गंभीर दखल घ्यावी आणि योग्य ती कारवाई करावी नाहीतर आम्ही आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही. आम्ही हिटलरशाही चालू देणार नाही .

    मनसेचे कल्याण जिल्हाध्यक्ष उल्हास भोईर यांनी एएसआय कर्मचाऱ्यांसोबत केडीएमसी उपायुक्त अतुल पाटील यांची भेट घेतली. याबाबत उल्हास भोईर यांनी सांगितले की, अतुल पाटील यांनी जे सांगितले आहे कर्मचारी काम करत नाही म्हणून इन्क्रिमेंट थांबवला आहे. अतुल पाटील एकदम खोटे बोलत आहेत. आमचे एएसआय सकाळी पासून दुपारपर्यंत काम करतात ड्युटीच्या अतिरिक्त ४ वाजेपर्यंत काम करतात. चारच्या नंतर जो कचरा पडतो त्यामध्ये आमच्या एएसआय कर्मचाऱ्यांचे काय दोष आहे. मी एकच सांगतो मी हिटलर शाही चालू देणार नाही. काम व्यवस्थित करत नाही म्हणून कारवाई याबाबत केडीएमसीचे अधिकरी अतुल पाटील यांनी सांगितले.

    आता आपल्याकडे महापालिकेत जवळजवळ २ हजार कर्मचारी ५० एसीआई आणि १० स्वच्छता अधिकारी कार्यरत आहेत. महापालिकेचे मूलभूत कर्तव्यच आहे की शहरांमध्ये स्वच्छता राखणे स्वच्छता ठेवणे कचऱ्याचे व्यवस्थित कलेक्शन करणे आणि याच्यामध्ये काही कर्मचाऱ्यांच्याकडून कोचराई झाली की त्याबाबत महापालिकेकडून कारवाई करण्यात येते आणि त्यानुसारच कायद्यानुसार ही कारवाई यांच्यामध्ये झालेली आहे. सगळ्यांना मी आवाहन करतोय की कर्मचाऱ्यांना दिलेलं काम आहे ते विविध मुदतीत आणि चांगल्या प्रकारे कॉलिटीचे काम झालं पाहिजे जे कर्मचारी चांगलं काम करतील त्यांचा ऍप्रिसिएशन ही करतोय परंतु जास्तीत जास्त कर्मचाऱ्यांचे ऍप्रिसिएशन मिळावं अशी आमची अपेक्षा आहे. कोणावर कारवाई होऊ नये ही आमची अपेक्षा आहे तर मी कर्मचाऱ्यांना आवाहन करते त्यांनी चांगल्या प्रकारे काम करा आपलं शहर स्वच्छ होण्यासाठी सगळे मिळून काम करू..