कल्याण पूर्वेतील डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारकाचे काम एप्रिल महिन्यात पूर्ण होणार – खासदार श्रीकांत शिंदे

स्मारकाच्या ठिकाणी 'ई' लायब्ररी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा संपूर्ण जीवनपट या ठिकाणी टेक्नॉलॉजी माध्यमातून साकरण्यात येणार आहे आणि डिसेंबर अखेर स्मारक बसवण्यात येईल असे सांगण्यात आले आहे.

    कल्याण : कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या कल्याण पूर्वेतील ‘ड’ प्रभागक्षेत्र येथील नियोजित सुरू असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाच्या कामाची पाहणी कल्याण लोकसभा क्षेत्राचे लोकप्रिय खासदार श्रीकांत शिंदे, आजच क.डो.मनपा आयुक्त पदाचा कारभार स्वीकरालेल्या डॉ. इंदूराणी जाखड यांनी पाहणी करीत आढावा घेतला.

    कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या नवनिर्वाचित आयुक्त इंदूराणी जाखडसह खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांनी कल्याण पूर्व येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकाचे काम सुरू केले आहे. त्या कामाची शनिवारी त्यांनी पाहणी केली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकासाठी मुख्यमंत्र्यांनी भरीव निधी दिलेला आहे. जोपर्यंत हे काम पूर्ण होत नाही तोपर्यंत मुख्यमंत्री या स्मारकाला निधी देत राहतील असे मत खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे आणि याप्रसंगी व्यक्त केले.

    स्मारकाच्या ठिकाणी ‘ई’ लायब्ररी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा संपूर्ण जीवनपट या ठिकाणी टेक्नॉलॉजी माध्यमातून साकरण्यात येणार आहे आणि डिसेंबर अखेर स्मारक बसवण्यात येईल असे सांगण्यात आले आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती पर्यंत स्मारकाचे लोकार्पण होणार आहे. असे प्रतिपादन याप्रसंगी खासदार श्रीकांत शिंदे यांनी प्रसिद्धी माध्यमांसमोर केले.

    याप्रसंगी शहर अभियंता अर्जुन आहिरे, उप आयुक्त धर्यशील जाधव, सविता हिले सहाय्यक आयुक्त ४ जे, धनंजय थोरात सहाय्यक आयुक्त ५ ड वार्ड, उप अभियंता धर्मन्रेद गोसावी, कार्यकारी अभियंता मनोज सांगळे, कल्याण नगररचनाकार सुरेंद्र टगळे, कल्याण पूर्व नगररचनाकार सचिन घुटे, माजी नगरसेवक महेश गायकवाड, माजी नगरसेवक मल्लेश गायकवाड, माजी नगरसेवक निलेश शिंदे, माजी नगरसेवक नवीन गवळी आदीसह शिवसेना शिंदे गटाचे पदाधिकारी उपस्थित होते.