केडीएमटी वर्कशॉपमध्ये लागलेल्या आगीत दोन बस जळून खाक

आगीचे भीषण रूप पाहता घटनास्थळी अग्निशमन दलाच्या ७ बंबानी पोहचत तातडीने बसला लागलेली आग विझविण्याचे काम सुरू केले. ७ अग्निशमन दलाच्या बंबाच्या सहाय्याने अग्निशमन दलाच्या जवानांनी या दोन्ही बसला लागलेल्या आगीवर नियंत्रण आणले.

    कल्याण : कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या रखडत सुरू असलेल्या परिवहन डेपो गणेशघाट आगारात वर्कशॉपमध्ये थांबलेल्या केडीएमटीच्या दोन बसला अचानक आग लागल्याची घटना शुक्रवारी रात्री सव्वाबाराच्या सुमारास घडली.

    प्रेम ऑटो गणेश घाट परिवहन डेपोत रनिंग रुट करून परतलेली एक बस वर्कशॉपमध्ये तपासणी दरम्यान थांबलेली असता सुत्राकडून मिळालेल्या प्राथमिक माहिती नुसार अचनाक शाँकसर्कीटमुळे बसला आग लागली आहे अशी प्राथमिक माहिती देण्यात आली आहे. यामुळे बाजूला उभ्या असलेल्या दुसऱ्या बसने देखील पेट घेतला. आगीचे भीषण रूप पाहता घटनास्थळी अग्निशमन दलाच्या ७ बंबानी पोहचत तातडीने बसला लागलेली आग विझविण्याचे काम सुरू केले. ७ अग्निशमन दलाच्या बंबाच्या सहाय्याने अग्निशमन दलाच्या जवानांनी या दोन्ही बसला लागलेल्या आगीवर नियंत्रण आणले. यानंतर कुलिंग ऑपरेशन पूर्ण करेपर्यंत तब्बल रात्रीचे साडेतीन वाजले. सुदैवाने लगत असलेल्या डिझेल पंप गृहाला या आगीत धक्का लागला नाही यामुळे संभाव्य हानी टळली.

    या आगीच्या घटनेनंतर शनिवारी सकाळी आतिरिक्त आयुक्त मंगेश चितळे यांनी घटनास्थळाची पाहणी केल्याचे अग्निशमन विभागाचे दामोदर वागंड यांनी संपर्क साधला असता सांगितले. तर केडीएमटी परिवहन व्यवस्थापक डॉ. दिपक सावंत यांच्याशी संपर्क साधला असता जळालेल्या दोन्ही बसचा १०० टक्के इशुरन्स असल्याचे सांगत आगीची घटना पाहता तातडीने बाजूच्या बस हालविण्यात आल्या. डिझेल पंपगृहापर्यंत आग पोहचणार नाही यांची दक्षता घेण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान या आगीच्या घटनेने बस आगारातील फायर फायटिंग यंत्रणेचा प्रश्न ऐरणीवर आला असल्याचे दिसते.