
आता कल्याण डोंबिवली महापालिकेत तीन वर्षापासून प्रशासकीय राजवट आहे. महापालिकेचे अधिकारी आणि कर्मचारी किती निर्ढावलेले आहेत हे स्पष्ट होते.
कल्याण : कल्याण डोंबिवली महानगरपालिकेकडून रस्त्यावरील खड्डे बुजवण्याचा दावा केला जातो. मात्र कल्याण डोंबिवलीतील दोन आमदारांनी महापालिकेच्या दाव्यांची पोलखोल केली आहे. भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी स्वखर्चातून एका रस्त्यावरील खड्डे बुजवले आहेत. तर मनसे आमदार राजू पाटील यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त बॅनर न लावता रस्त्यावरील एक खड्डा तरी भरा असे आवाहन कार्यकर्त्यांना केले आहे. यावरून महापालिका क्षेत्रात रस्त्यांची बिकट परिस्थिती दिसून येते.
कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात अनेक ठिकाणी रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य आहे. केडीएमसी आयुक्त भाऊसाहेब दांगडे यांनी आश्वासन दिले होते की, गणेश उत्सवाआधी सर्व रस्त्यावरील खड्डे बुजवले जातील. यासाठी त्यांनी एक नाही तर १३ सप्टेंबर ची डेडलाईन देखील दिली होती. मात्र गणेश उत्सव सुरू होऊन ५ दिवस उलटून गेले तरी रस्त्यावरील खड्डे बुजवले नाहीत. टिटवाळा मध्ये रस्त्यावरील खड्डे बुजवण्यासाठी कशाप्रकारे भर पावसात डांबरीकरण केले जात आहे कसा प्रकारे निकृष्ट दर्जाच्या काम सुरू आहे. या कामाची पोलखोल शिवसेना शिंदे गटाचे पदाधिकारी विजय देशेकर यांनी केली होती. आयुक्तांनी सांगितले होते खड्डे भरण्यासाठी निष्काळजीपणा करणाऱ्यांवर ठोस कारवाई करणार. मात्र कारवाई काही झाली नाही परंतु लोकांना त्रास भोगावा लागत आहे.
कल्याण पूर्वेतील चिंचपाडा परिसरात रस्त्यावरील खड्ड्यांमुळे नागरिक हैराण झाले आहेत. गणेश उत्सवाआधी रस्ता दुरुस्त करावा यासाठी स्थानिक नागरिकांनी वारंवार महापालिकेला विनंती केली. मात्र महापालिकेकडून चालढकल सुरू होती.अखेर स्थानिक नागरिकांनी कल्याण पूर्वचे भाजप आमदार गणपत गायकवाड यांची भेट घेतली. गणपत गायकवाड यांनी स्वखर्चातून या रस्त्यावरील खड्डे बुजविले आहेत. महानगरपालिकेचे काम भाजप आमदारांना स्वखर्चातून करावे लागले
दुसरीकडे मनसे आमदार राजू पाटील यांच्या २६ सप्टेंबर रोजी वाढदिवस आहे. या दिवशी ते स्वतः देवदर्शनाला जातात. मात्र कार्यकर्ते त्यांच्या वाढदिवसानिमित्त ठिकठिकाणी कार्यक्रम आणि बॅनरबाजी करतात. यावेळी मनसे आमदार राजू पाटील यांनी कार्यकर्त्यांना आवाहन केले आहे, की माझा वाढदिवसाच्या बॅनर लावण्याऐवजी रस्त्यावरील एक खड्डा तरी भरा. लोक मला आणि तुम्हाला आशीर्वाद देतील. मनसे आमदार राजू पाटील यांना देखील रस्त्यावर खड्ड्यांची परिस्थिती किती बिकट आहे त्यासाठी मनसे आमदार राजू पाटील यांनी कार्यकर्त्यांना अस आवाहन करण्याची वेळ आली आहे.
आता कल्याण डोंबिवली महापालिकेत तीन वर्षापासून प्रशासकीय राजवट आहे. महापालिकेचे अधिकारी आणि कर्मचारी किती निर्ढावलेले आहेत हे स्पष्ट होते. आता तरी सत्ताधाऱ्यांकडून महापालिका अधिकाऱ्यांची कान उघडली केली जाते की नाही हे पाहणे देखील महत्वाचे ठरणार आहे.