केडीएमसीच्या डॉक्टरांचे स्टेटस सोशल मिडियावर व्हायरल, चक्क डॉक्टरने केले पंतप्रधानांना आव्हान

कल्याण डाेंबिवली महापालिका क्षेत्रातील लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. केडीएमसीकडे दोन मुख्य रुग्णालये आहेत. कल्याणमध्ये रुक्मीणीबाई आणि डेांबिवलीत शास्त्रीनगर आहे.

    कल्याण : केडीएससीची दोन रुग्णालये आहेत. मात्र डोंबिवलीच्या शास्त्रीनगर रुग्णालयात पोस्ट मार्टम प्रक्रिया सुरु व्हावी यासाठी केडीएमसीचे डॉक्टर पराग पाडवी यांनी भरपूर प्रयत्न केले आहेत. परंतू अजून पोस्ट मार्टम सुरु झालेले नाही. अखेर या डॉक्टरने थेट देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आव्हान केले आहे की, पंतप्रधानामध्ये हिंमत असेल तर डोंबिवली शास्त्रीनगर रुग्णालयात पोस्टमार्टम सुरु करुन दाखवा असे त्याने स्टेट्स ठेवले आहे. ते स्टेटस चांगलेच व्हायरल झाले आहे.

    कल्याण डाेंबिवली महापालिका क्षेत्रातील लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. केडीएमसीकडे दोन मुख्य रुग्णालये आहेत. कल्याणमध्ये रुक्मीणीबाई आणि डेांबिवलीत शास्त्रीनगर आहे. पेास्टमार्टमची सुविधा केवळ रुक्मीणीबाई रग्णालयात आहे. त्यामुळे डॉक्टर, कर्मचाऱ्यांना आणि नागरीकांना त्रास सहन करावा लागत आहे. डोंबिवलीतील शास्त्रीनगर रुग्णलायात देखील पोस्ट मार्टमची सुविधा सुरु व्हावी यासाठी वारंवार मागणी करण्यात आली आहे. मात्र ती सुविधा अद्याप सुरु झालेली नाही. डोंबिवली आणि कल्याण ग्रामीण मधल्या नागरीकांना मृतदेह शवविच्छेदनासाठी कल्याणला यावे लागते. तासंतास त्याठिकाणी ताटकळत राहावे लागते. नागरीकांची आणि डॉक्टरांची परिस्थिती लक्षात घेता. केडीएमसीचे डॉक्टर पराग पाडवी यांनी वारंवार शास्त्रीनगर रुग्णलायात पोस्ट मार्टमची सुविधा सुरु करण्यात यावी यासाठी मागणी केली आहे.

    त्याठिकाणी बांधकाम पूर्ण करण्यात आले त्याठिकाणी काम सुरु झालेले नाही. खासदार श्रीकांत शिंदे, मंत्री रविंद्र चव्हाण यांच्या मतदार संघात हे रुग्णालय आहे. तरी देखील या ठिकाणी पोस्ट मार्टम सुरु का केले जात नाही. हा प्रश्न अनुत्तरीत आहे. आत्ता तर डॉक्टर पाडवी यांनी फोनवर स्टेटर ठेवले आहे. आदरणीय पंतप्रधान नमस्कार, तुमच्यात हिंमत असेल तर शास्त्रीनगरमध्ये पोस्ट मार्टम सुरु करुन दाखवा. डॉक्टरची ही पोस्ट चांगलीच व्हायरल झाली आहे.