कल्याण लोकसभेत आता शिवसेना मनसे आमने-सामने

इथल्या लोकप्रतिनिधी बद्दल नागरिक आणि राजकीय नेत्यांमध्ये रोष, त्यांना बदल हवं. मनसे आमदार राजू पाटील यांची नाव न घेता श्रीकांत शिंदे यांच्यावर टीका, तर काही लोक आपल्या पोळी भाजण्यासाठी प्रसिद्धीसाठी असे विधान करतात शिवसेना आमदार विश्वनाथ भोईर यांचा पलटवार

    कल्याण : कल्याण डोंबिवलीत पुन्हा एकदा राजकारण चांगलचं तापलं आहे. काही दिवसांपासून कल्याण लोकसभा मतदारसंघातून आदित्य ठाकरे निवडणूक लढणार आहेत अशी चर्चा सुरू झाली आहे. या चर्चेनंतर राजकीय नेत्यांची प्रतिक्रियेला सुरुवात झाली. यावर आता मनसे आमदार राजू पाटील यांनी आपली प्रतिक्रिया देत नाव न घेता खासदार श्रीकांत शिंदे यांच्यावर टीका केली आहे. मनसे आमदार राजू पाटील यांच्या टीकेला शिवसेना शिंदे गटाचे आमदार विश्वनाथ भोईर यांनी प्रत्युत्तर दिल आहे.
    मनसे आमदार राजू पाटील यांचं टीकास्त्र
    इथल्या लोकप्रतिनिधी बद्दल सर्वसामान्य लोकांमध्ये आणि राजकीय नेत्यांमध्ये रोष आहे. त्यांना बदल हवा आहे. त्यासाठी हे सर्व गोष्टी घडत आहेत. तो बदल करण्याच्या अनुषंगाने किंवा फायदा घेण्याच्या अनुषंगाने सर्व उड्या घेत आहेत. सर्वांना शुभेच्छा असे विधान मनसे आमदार राजू पाटील यांनी केलंय. आमदार राजू पाटील कल्याण पूर्वेतील पिसोळी परिसरात माजी उपमहापौर मोरेश्वर भोईर यांच्याकडून आयोजित करण्यात आलेल्या भागवत कथा कार्यक्रमात उपस्थित होते या कार्यक्रमानंतर त्यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
    शिवसेना आमदार विश्वनाथ भोईर यांचा पलटवार
    राजकीय लोकांमध्ये नाराजी असेल तर ठीक आहे त्याच्या पक्षाला मदत नाही केली किंवा त्यांना डिवचले तर विरोध करतो तो भाग वेगळा आहे .परंतु कल्याण लोकसभेत सामान्य लोकं असं बोलत असेल हे मला चुकीचं वाटतं, कारण खासदार किती काम करतायत ते आपण खासदार श्रीकांत शिंदे यांच्या रूपाने बघितलय. एक कर्मयोगी चांगला कार्यकर्ता चांगला कार्यसम्राट खासदार म्हणून त्यांची प्रतिमा तयार होतेय. सामान्य लोक त्यांना डोक्यावर घेऊन नाचतायत. परंतु काही लोक विनाकारण आपलं स्वतःची पोळी भाजण्यासाठी काहीतरी बोलावं म्हणजे फेमस होईल. तुम्ही पण काय करता कोणीतरी जो वेगळं बोलतो त्याला डोक्यावर घेता आणि फेमस करता. आमच्याकडे नाही चालत आम्ही कामातून उत्तर देतो. विश्वनाथ भोईर यांच्या हस्ते आज कल्याण पश्चिम येथील रामदास वाडी परिसरात माजी नगरसेवक विद्याधर भोईर माजी नगरसेविका प्रियंका विद्याधर भोईर यांच्या प्रभागात कॉंक्रिटीकरण रस्त्याचा भूमिपूजन कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी आमदार विश्वनाथ भोईर यांनी हे विधान केले आहे.