बालिश बहु बायकांत बडबड अशी शिवसेना शहर प्रमुखाची स्थिती, भाजपचा शिवसेना शहर प्रमुखांवर पलटवार

उगाच बडबड करुन बातम्यांमध्ये राहणे हा त्यांचा केविलवाणा प्रयत्न आहे. त्यांचा हा प्रयत्न म्हणजे बालिश बहु बायकांत बडबडला असा आहे.

    कल्याण : कल्याण पूर्वेचे भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी केलेल्या टिकेला शिवसेना शहर प्रमुख महेश गायकवाड यांनी प्रतिउत्तर दिले. शहर प्रमुख हे काही तरी कागद घेऊन येतात. चार कागद आणले तर तो पुरावा होत नाही. त्यांची ही बडबड केवळ बातम्यांमध्ये राहणे हा त्यांचा केवीलवाणा प्रयत्न आहे. त्यांचा हा प्रयत्न म्हणजे बालिश बहु बायकांत बडबडला असा प्रकार आहे अशी खरमरीत टिका भाजप पदाधिकारी संदीप तांबे यांनी केली आहे.

    कल्याण पूर्वेतील भाजप आमदार गायकवाड आणि शिवसेना शहर प्रमुख गायकवाड याच्यातील वाद संपायचे नावच घेत नाही. आमदार गायकवाड यांनी शिंदे गटाकडून भाजपचा छळ सुरु असल्याचा आरोप केला होता. तसेच त्यांच्याकडे धनुष्यबाण आहे तर माझ्याकडे रॉकेट असल्याचे म्हटले होते. त्या पश्चात शहर प्रमुख गायकवाड म्हणाले त्यांनी धनुष्यबाणाचे नाव घेऊ नये. रॉकेट जतना कोणत्या ठिकाणी घालेल सांगता येणार नाही असे प्रतिउत्तर दिले होते. यासोबतच भ्रष्टाचार आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारकाबद्दल देखील विधान केले होते. शिवसेना शहर प्रमुख गायकवाड यांनी दिलेल्या प्रतिउत्तरानंतर पुन्हा भाजपचे पदाधिकारी तांबे यांनी महेश गायकवाड यांच्यावर पलटवार केला आहे.

    तांबे यांनी सांगितले की, विना पूराव्याचे आरोप करायचे. चार कागद दाखविले म्हणजे पुरावे होत नाही. ज्या कामाविषयी ते आरोप करीत आहे. ते काम ३० गाव येथे नाही. माजी नगरसेवक गायकवाड यांना ते काम नक्की कुठे आहे हेच माहिती नाही. त्याठिकाणी वि्ठठल रुक्मीणीचे शिल्प आहे. त्याचबरोबर स्वानंद अध्यात्मीक मंडळ आहे. त्याठिकामी वारकरी येतात. त्यासाठी बाकडे ठेवले आहे. या कामाचे बिल अद्याप निघालेले नाही कामही पूर्ण झालेले नाही. त्याबद्दल त्यांनी माहिती घेऊन बोलावे. डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारकाचे तीन वेळा उद्घाटन झालेच नाही. त्या स्मारकाच्या जागेचे हस्तांतर करण्यापासून सर्व परवानग्या आणण्याचे काम आमदार गणपत गायकवाड यांनी केले आहे. उगाच बडबड करुन बातम्यांमध्ये राहणे हा त्यांचा केविलवाणा प्रयत्न आहे. त्यांचा हा प्रयत्न म्हणजे बालिश बहु बायकांत बडबडला असा आहे.