मराठी तरुणाशी मराठी बोलण्यावरून परप्रांतीय फेरीवाल्यांशी घातला वाद, मनसे कार्यकर्त्यांनी दिला फेरीवाल्यांला चोप

वस्तू थोडी खराब वाटली म्हणून त्याने परत केली. पण फेरीवाल्याने पैसे परत देण्यास नकार दिला. या फेरीवाल्याने या तरुणाशी उद्धट वर्तन करत तुम्ही मराठी लोक असेच आहात असं बोलला.

    कल्याण : कल्याण मधील स्कायवॉक वर परप्रांतीय फेरीवाल्यांची मुजोरी दिवसेंदिवस वाढत चालली आहे. काल वाशिंद येथे राहणारा तरुण काही कामानिमित्त कल्याणमध्ये आला होता. हा तरुण पुन्हा कल्याण स्टेशन वर आला. फेरीवाल्यांकडून काही सामान घेत असताना मराठी बोलण्यावरून या तरुणाचा फेरीवाल्यांशी वाद झाला. चार ते पाच फेरीवाल्यांनी या तरुणाला बेदम मारहाण केली. या तरुणाने याबाबत मनसे कार्यकर्त्यांना माहिती दिली मनसे कार्यकर्त्यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. मराठी तरुणाला मारहाण करणाऱ्या चार ते पाच फेरीवाल्यांना बेदम चोप दिला. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला.

    या घटनेमुळे कल्याण स्कायवॉक वर बसणाऱ्या परप्रांतीय फेरीवाल्यांची मुजोरी पुन्हा एकदा समोर आली. पुन्हा मराठी तरुणांना मारहाण केल्यास मनसे स्टाईलनेच त्यांना उत्तर देऊ असा इशारा देखील मनसेने दिला आहे. वाशिंद मधील एक विध्यार्थी कल्याण मध्ये काही कामानिमित्त आला होता. घरी परतत असताना रेल्वे स्टेशन वरील स्कायवर असलेल्या एका फेरीवाल्याकडून एक वस्तू घेतली. वस्तू थोडी खराब वाटली म्हणून त्याने परत केली. पण फेरीवाल्याने पैसे परत देण्यास नकार दिला. या फेरीवाल्याने या तरुणाशी उद्धट वर्तन करत तुम्ही मराठी लोक असेच आहात असं बोलला.

    या विद्यार्थ्याने माझ्या भाषेवरून बोलू नका नाहीतर मनसेकडे जाईल असे सांगितले असता तीन ते चार फेरीवाल्यांनी त्याला मारहाण केली. या तरुणाने या घडलेल्या प्रकाराबाबत मनसे कार्यकर्त्यांना सांगितले. मनसे कार्यकर्त्यांनी तात्काळ स्कायवॉकवर धाव घेत चार ते पाच फेरीवाल्यांना शोधून चोप देत फेरीवाल्यांचा चांगलाच समाचार घेतला. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला. मराठी भाषेचा मराठी तरुणांचा अपमान सहन करणार नाही पुन्हा परप्रांतीय फेरीवाल्यांनी असे गैरवर्तन केल्यास त्यांना मनसे स्टाईलने धडा शिकवू असा इशारा दिला.