नदीत आंघोळीला गेलेली मुले बेपत्ता, वेळीच पोलिसांनी शोध घेतल्यामुळे अनर्थ टळला

कल्याणमध्ये राहणारे विजय तोंबर हे जोशी बागेत राहतात. त्यांची मुले जोशी बागेतील शाळेत शिकतात. सकाळी मुले शाळेत गेली.

    ठाणे : शाळेत शिकण्यासाठी गेलेली तीन मुले अचानाक बेपत्ता झाली. वडिलांनी या संदर्भात महात्मा फुले पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केली. पोलिसांना एक मुलगी आणि दोन मुलांना खडवली नदी परिसरातून शोधून काढले. पोलीस वेळीच पोहचल्याने मुले वाचली. ही मुले ही एकदम लहान आहेत. कदाचित ही मुले नदीत उतरली असतील.

    कल्याणमध्ये राहणारे विजय तोंबर हे जोशी बागेत राहतात. त्यांची मुले जोशी बागेतील शाळेत शिकतात. सकाळी मुले शाळेत गेली. शाळेच्या गेटवर या तिघांना त्यांचे शिक्षक भेटले. ही मुले अचानाक बेपत्ता झाली. ही मुले घरी न आल्याने या संदर्भात कल्याणच्या महात्मा फुले पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक अशोक होनमाने आणि पोलीस निरिक्षक प्रदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सूचित टिकेकर यांच्या पथकाने मुलांचा शोध घेतला. परिसरातील सीसीटीव्ही चेक केले.

    सीसीटीव्हीत ही मुले आसनगावच्या दिशेने लोकल ट्रेनने गेल्याचे दिसून आले. या तिघांनी सांगितले की, खडवली नदीत आंघोळीसाठी निघाले होते. हे ऐकून पोलीस सुद्धा हैराण झाले. ही मुले नदीत गेली असती तर काय झाले असते. सुदैवाने कोणतीही जिवीत हानी घडलेली नाही. ही मुले त्यांच्या कुटुंबियांच्या ताब्यात देण्यात आलेली आहेत.