लहान मुलांचे भांडण सोडवणे चेअरमॅनला पडले महागात, चेअरमनवर धारदार शास्त्राने हल्ला

सीसीटीव्हीमध्ये ही घटना कैद असल्याने सीसीटीव्ही फुटेज मानपाडा पोलिसांना देण्यात आले आहे.

    डोंबिवली : लहान मुलांचे भांडण सोडवणे सोसायटीच्या चेअरमनला महागात पडले. भांडण का सोडवले यांच्या राग मनात ठेवून लहान मुलांच्या चुलत्याने आपला मित्रांसोबत सोसायटीच्या चेअरमनवर धारदार शास्त्राने हल्ला करण्याच्या प्रयत्न केला आहे. डोंबिवलीतील लोढा हेवन या हाय प्रोफाईल सोसायटी हा प्रकार घडला आहे. मानपाडा पोलिसांनी प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. मात्र चेअरमन हे मराठी असल्याने त्यांना जाणीवपूर्वक त्रास दिला जात असल्याचे त्यांच्या आरोप आहे.

    डोंबिवली पूर्वेत लोढा हेवन कॉम्प्लेक्स मध्ये ओम प्राईस ही सोसायटी आहे. काही दिवसांपूर्वी या सोसायटीत राहणारे सिंग कुटुंबातील एका मुलाचे दुसरा एका मुलासोबत भांडण झाले होते. हे भांडण सोसायटीचे चेअरमन सागर जोशी यांनी सोडवले होते. लहान मुलाच्या नातेवाईकांना याचा राग आला. याचां राग मनात ठेवून लहान मुलाचा चुलता रविवारी सकाळी आपला एका मित्रासोबत ओम प्राईस सोसायटीत आला, दोघांनी सोसायटीत येऊन गोंधळ घालायला सुरुवात केली. आकाश सिंग असे या त्याचे नाव सांगितले जात आहे. आकाश हा आपला एका मित्रासोबत सोसायटीत आला. त्यांच्या हातात धारदार शस्त्र होते. सागर जोशी यांचा आरोप आहे की, सर्वात आधी या लोकांनी सोसायटीच्या सुरक्षारक्षकांसोबत हुज्जत घालत त्याला धक्काबुक्की केली. त्यानंतर एका व्यक्तीला धक्काबुक्की केली. नंतर जेव्हा सागर जोशी हे घरातून खाली आले.

    त्यांच्यावर हल्ला केल्याच्या प्रयत्न केला मी मराठी असल्याने जाणीवपूर्वक मला या ठिकाणी त्रास दिला जात असल्याचे आरोप सागर जोशी यांनी केला आहे. सीसीटीव्हीमध्ये ही घटना कैद असल्याने सीसीटीव्ही फुटेज मानपाडा पोलिसांना देण्यात आले आहे. या प्रकरणात मानपाडा पोलीस ठाण्यात सागर जोशी यांनी तक्रार दिली आहे. मात्र एका हाय प्रोफाईल सोसायटीत सोसायटीच्या चेअरमनला या प्रकारची वागणूक दिली जात असल्याच्या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. मानपाडा पोलीस या प्रकरणाच्या तपास करीत आहेत. या प्रकरणात सागर जोशी यांच्या आरोपात नंतर पोलीस काय कारवाई करतील हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.