
मानपाडा पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्याची प्रक्रिया सुरू आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करत कायदेशीर कारवाई करण्यात येईल असे पोलिसांनी सांगितले.
कल्याण : खाजगी कंपनीच्या लाईन टाकण्याच्या वादातून एक तरुण आणि त्याच्या पत्नीला बेदम मारहाण केल्याची घटना कल्याण मधील आडवली ढोकली परिसरात घडली आहे. या प्रकरणी मानपाडा पोलिसांनी तपास सुरू केला. मात्र एका पती-पत्नीला टोळीकडून मारहाण केली जात होती. नागरिकांनी फक्त बघ्याची भूमिका घेतली होती.
कल्याण पूर्वेकडील अडीवली ढोकळी परिसरात चंदन झा आपल्या कुटुंबासह राहतो. त्याच्या घरावर एका खाजगी कंपनीचे टॉवर आहे. या टॉवर वरून चंदन व त्याच्या भावांमध्ये वाद सुरू आहेत. या टॉवरवर लाईन टाकण्याचे काम सुरू होते. चंदनने या कामाला विरोध केला. यावरून धमकी आल्याचा आरोपीही चंदनने केला आहे. आज सकाळी याच वादातून चंदन झा व त्याच्या पत्नीला काही तरुणांच्या टोळीने मारहाण केली. याबाबत चंदन झा यांनी सांगितले की, माझ्या घरावर असलेल्या मोबाईल टॉवरला माझा विरोध आहे. त्यातून माझे भावांशी वाद सुरू आहेत. या टावरला लाईन टाकण्याचे काम सुरू आहे. मी या कामाला विरोध केला आहे. त्यावेळी मला राहुल पाटील यांचा फोन आला त्याने मला धमकी दिली.
पुन्हा राहुल पाटील यांच्या हस्तक सोनू ठाकूर यांने काही तरुणांसह मला मारहाण केली. माझी पत्नी मला सोडवण्यासाठी आली असता माझ्या पत्नीला देखील मारहाण केली गेली .दरम्यान या प्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्याची प्रक्रिया सुरू आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करत कायदेशीर कारवाई करण्यात येईल असे पोलिसांनी सांगितले. तर याबाबत राहुल पाटील यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी या घटनेचे माझा काही संबंध नाही. माझ्यावर चुकीचे आरोप केले जात आहेत असे सांगितले.