१५५ दिवसांवर निवडणुका केंद्रीय पंचायतराज मंत्री कपिल पाटील यांचे सूचक विधान

एन डी ए गटबंधन एल आय सी सारखं जिंदगी के साथ भी जिंदगी के बाद भी - केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांचा इंडिया आघाडीला टोला.

    कल्याण : गेल्या वेळी ५ मार्चला आचारसंहिता लागू झाली. एकदा माझा वाढदिवसाला लागली एकदा त्याच्या दोन-तीन दिवस पुढे लागली. म्हणजे १५५ दिवसांवर निवडणूका आहेत. त्यामुळे १५५ दिवसांचे नियोजन केलं पाहिजे असे सूचक विधान केंद्रीय पंचायतराज मंत्री कपिल पाटील यांनी कल्याणमध्ये केलं. मात्र याबाबत त्यांना प्रश्न विचारला असता त्यांनी मी भविष्यवाणी केली नाही, मागच्या वेळेला त्याच तारखेला आचारसंहिता लागली होती. मी भूतकाळ सांगितला असे स्पष्टीकरण त्यांनी दिलं. कपिल पाटील कल्याण पश्चिममध्ये भाजपच्या पद नियुक्ती कार्यक्रमात ते उपस्थित होते .यावेळी त्यांनी हे वक्तव्य केले. या कार्यक्रमात आमदार गणपत गायकवाड यांचे सुपुत्र वैभव गायकवाड यांची कल्याण युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष पदी नियुक्ती झाली. वैभव गायकवाड यांच्यासह अन्य पदाधिकाऱ्यांचे देखील यावेळी नियुक्ती करण्यात आली .

    एन डी ए गटबंधन एल आय सी सारखं जिंदगी के साथ भी जिंदगी के बाद भी – केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांचा इंडिया आघाडीला टोला. उद्धव ठाकरे यांनी यंदाच्या निवडणुकीत भाजपाला गाडणार असं आवाहन केलं होतं. केंद्रीय पंचायत राज मंत्री कपिल पाटील यांनी उद्धव ठाकरे यांना प्रत्युत्तर दिले. एनडीए गटबंधन म्हणजे घडी डिटर्जंट पावडर नाही पहिले इस्तेमाल करो फिर विश्वास करो, तर एन डी ए गटबंधन एल आय सी सारखे आहे. जिंदगी के साथ भी जिंदगी के बाद भी असा टोला लगावला. पुढे बोलताना एनडीए मधील घटक पक्षांचा नरेंद्र मोदींवर विश्वास आहे. २०२४ ची निवडणूक एनडीएच्या माध्यमातून भाजप जिंकेल यामध्ये तीळमात्र शंका नाही. आमचा नेता ठरलेला त्यांना अजून नेता ठरवता येत नाही. मोदीजींना जनतेने स्वीकारल आहे. इतका आशीर्वाद ज्यांच्या मागे आहे त्यांचे या निवडणुकीत कोणीच काही करू शकणार नाही असा टोला उद्धव ठाकरे यांना लगावला.