
खाडीत पीओपी मुर्ती विसर्जन करू नयेत अशा हरित लावादच्या सूचना आहेत. त्याबाबत जिल्हाधिकारी यांनी सांगितले कि, आज होणाऱ्या गणपती विसर्जनात पीओपी मुर्ती किती यांची आकडेवारी घेऊन माहिती देणार असे सांगितले.
कल्याण : कल्याण डोंबिवली मनपाच्या अतिरिक्त कारभाराचा पदभार जिल्हाआधिकारी अशोक शिनगारे यांच्या कडे असल्याने गुरुवारी त्यांनी कल्याण डोंबिवली क्षेत्रातील समस्यांबाबत केडीएमसी अतिरिक्त आयुक्तांसह उपआयुक्त, सहाय्यक आयुक्त, पोलीस प्रशासन यांच्या सोबत आढावा बैठक घेतली. यामध्ये राष्ट्रीय स्वच्छता अभियान तसेच मेरी माटी मेरा देश अभियानाचा आढावा घेतला.
आज होणारे गणपती विर्सजन व्यवस्थित रित्या होण्यासाठी सोयी सुविधा बाबत आढावा घेतला असून कल्याण डोंबिवली क्षेत्रातील रस्त्यावरील खड्या संदर्भात अद्याप देखील ठेकेदाराने कामचुकारपणा केल्याने रस्त्यावरील खड्डे बुजविले नसल्याच्या प्रश्नाबाबत पत्रकारांनी विचारले असता माहिती घेऊन याबाबत ठेकेदारावर चौकशी अंती दोषी आढळल्यास कारवाई चा बडगा उचलणार असल्याचे सांगितले.
मनपा क्षेत्रातील आरोग्य प्रश्न बाबत माहिती घेतली आहे. मोहने परिसरातील डेंग्यू चा महिनाभरातील दुसरा बळी तसेच मलेरिया तपासणी सर्व्हे क्षण गती फिरते दवाखाना याबाबत पत्रकारांनी विचारले असता यासंदर्भात तातडीने माहिती घेऊन आरोग्य विभागाला संदर्भीत परिसरात भेट देऊन आवश्यक उपयोजना करण्याबाबत सांगणार आहे. खाडीत पीओपी मुर्ती विसर्जन करू नयेत अशा हरित लावादच्या सूचना आहेत. त्याबाबत जिल्हाधिकारी यांनी सांगितले कि, आज होणाऱ्या गणपती विसर्जनात पीओपी मुर्ती किती यांची आकडेवारी घेऊन माहिती देणार असे सांगितले.