रस्त्यावरील अचूक खड्डे मोजून दाखवा ५१ हजार रुपयांचे बक्षिस मिळवा, कल्याण राष्ट्रवादी काँग्रेसची घोषणा

दरम्यान कल्याण पूर्वेतील एका विकास कामांच्या भूमीपूजन कार्यक्रमात भाजप आमदार गायकवाड यांना रस्त्यावरील खड्डयांवर प्रश्न विचारला असता त्यांनी सांगितेल की, खड्डे बुजविण्याचे आश्वासन सर्वच लोक देत आहेत.

    कल्याण : खासदार श्रीकांत शिंदे हे दोन वेळा खासदार, आमदार गणपत गायकवाड हे तीन वेळा आमदार, मुख्यमंत्री ठाणे जिल्ह्याचे, तरी पण कल्याण पूर्वेला सावत्र वागणूक का मिळत आहे? असा सवाल कल्याणच्या राष्ट्रवादी युवक काँग्रेसकडून उपस्थित करण्यात आला आहे. रस्त्यावरील खड्डे अचूक मोजून दाखविल्यास त्याला राष्ट्रवादीकडून ५१ हजाराचे प्रथम पारितोषिक आणि ४१ हजाराचे द्वीतीय आणि ३१ हजार रुपयांचे तृतीय पारितोषिक दिले जाईल असे राष्ट्रवादीचे जिल्हा युवक कार्याध्यक्ष राष्ट्रवादी पक्षाचे राष्ट्रवादी युवक कार्याध्यक्ष विश्वास आव्हाड यांनी घोषणा केली आहे. तर खड्ड्यामुळे नागरीकांचे मणके ढिले झाले आहेत. मोठ्या नेत्यांना खड्यांचा त्रास दिसत नाही. टेंडर प्रक्रिया बदलली पाहिजे अशी प्रतिक्रिया भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी देत रस्त्यावरील खड्ड्यांचे खापर टेंडर प्रक्रियेवर फोडले आहे.

    कल्याण डोंबिवलीत रस्त्यावरी खड्डे बुजविले गेले नसल्याने नागरीकांना त्रास सहन करावा लागत आहे. गणेशोत्सवापूर्वी खड्डे भरले जाणार असा दावा महापालिकेकडून करण्यात आला होता. महापालिका प्रशासनाचा दावा फेल ठरला आहे. रस्त्यावर खड्डे आहेत जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी देखील मान्य करीत माहिती घेतो आणि चौकशी करुन दोषींच्या विरोधात नक्कीच कारवाई केली जाईल असे गुरुवारी स्पष्ट केले आहे. आयुक्त भाऊसाहेब दांगडे हे रजेवर असल्याने महापालिका आयुक्त पदाचा प्रभारी पदभार जिल्हाधिकाऱ्यांकडे आहे. त्यांनी गुरुवारी यासंदर्भात बैठक घेतली. आयुक्तानंतर जिल्हाधिकारी यांनी देखील कारवाई करण्याचे म्हटले आहे. मात्र कारवाई होणार की नाही याबाबत संशय व्यक्त केला जात आहे.

    खड्डयांची परिस्थिती पाहता कल्याणच्या राष्ट्रवादीचे कार्यकारी युवकाध्यक्ष विश्वास आव्हाड यांनी काल कार्यकर्त्यासोबत कल्याण पूर्वेत रस्त्यांची पाहणी केली. ढाेल ताशे वाजवित त्यांनी नागरीकांना आवाहन केले की, जो कोणी रस्त्यावरील खड्डे अचूक मोजून दाखवेल त्याला ५१ हजार रुपयांचे पहिले पारितोषिक दिले जाईल. तसेच दुसरे पारिषिक ४१ हजार आणि तिसरे पारितोषिक ३१ हजार रुपये दिले जाईल. कल्याणचे खासदार श्रीकांत शिंदे हे दोन वेळा खासदार, आमदार गणपत गायकवाड हे तीन वेळा आमदार, मुख्यमंत्री ठाणे जिल्ह्याचे तरी पण कल्याण पूर्वेला सावत्र वागणूक का मिळते आहे असा सवाल उपस्थित करीत मुख्यमंत्र्यांनी कल्याण पूर्वेच्या विकासाकडे लक्ष द्यावे असे आवाहन राष्ट्रवादीच्या वतीने आव्हाड यांनी केले आहे.

    दरम्यान कल्याण पूर्वेतील एका विकास कामांच्या भूमीपूजन कार्यक्रमात भाजप आमदार गायकवाड यांना रस्त्यावरील खड्डयांवर प्रश्न विचारला असता त्यांनी सांगितेल की, खड्डे बुजविण्याचे आश्वासन सर्वच लोक देत आहेत. रस्त्यात खडडे की खड्ड्यात रस्ते अशी परिस्थिती आहे. जे लोक टेंडर घेतात. ती पद्धत बंद झाली पाहिजे. कचरा, रस्त्यावरील खड्डे याचा नागरीकांना नेहमीच त्रास होतो. अनेक रस्ते नवे तयार करुन देखील त्याठिकाणी खड्डे पडले आहेत. खड्यांमुळे नागरीकांना मानेचा आणि कंबरेचा त्रास होऊन नागरीकांना आजाराला सामोरे जावे लागते. त्यामुळे टेंडर प्रक्रियेत बदल करणे गरजेचे आहे असे सांगत रस्त्यांच्या खड्ड्यांचे खापर टेंडर प्रक्रियेवर फोडले होते.