
पक्षाच्या जेष्ठ नेत्यांनी त्यांच्या विरुद्ध ठोस अशी कारवाई करावी, अशी आमची मागणी आहे आणि अशी विकृती नेत्या बद्दल बोलण्याची ही महाराष्ट्रातून महाराष्ट्राच्या संस्कृतीला शोभेशी नाहीये.
कल्याण :- कल्याणमधील छत्रपती शिवाजी महाराज चौकात गोपीचंद पडळकर विरोधात अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी रविवारी पडळकरांच्या फोटोला जोडे मारो आंदोलन केले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांना लांडग्याचं पिल्लू म्हटल्यानंतर भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्याविरोधात राज्यभरात राष्ट्रवादी काँग्रेसचा अजित दादा गट आंदोलन करीत आहे. या बेताल वक्तव्याचे पडसाद रविवारी कल्याणामध्ये उमटले. छत्रपती शिवाजी महाराज चौकात कल्याणमधील राष्ट्रवादी काँग्रेस अजित दादा गटाच्या कार्यकर्त्यांनी गोपीचंद पडळकर यांच्या विरोधात घोषणाबाजी, करीत पडळकर यांच्या फोटोला जोडे मारून आंदोलन करीत अजित पवारांविरोधात बेताल वक्तव्य करणारे पडळकर यांवर कारवाई करा अशी मागणी केली.
याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कल्याण डोंबिवली शहर जिल्हा उपाध्यक्ष रामचंद्र यावलकर यांनी प्रसिद्धी माध्यामांना प्रतिक्रिया दिली, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कल्याण डोंबिवली शहर जिल्हाच्या वतीने गोपीचंद पडळकर, भारतीय जनता पक्षाचे आमदार यांनी आमच्या नेतृत्वाबद्दल ज्या शब्दांचा दूर उपयोग केलाय. त्या शब्दाचा निषेध करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कल्याण डोंबिवली शहर जिल्ह्याचे कार्यकर्ते निषेध करण्यासाठी या ठिकाणी एकत्र आलेले आहोत. गोपीचंद पडळकर या समाजातील एक विकृती आहे. आमच्या नेत्यांबद्दल वारंवार यांच्याकडून चुकीच्या भाषेचा वापर करण्यात आलेला आहे. या भाषेचा निषेध करण्यासाठी आम्ही एकत्र आलेलो आहोत.
त्यांच्या पक्षाच्या जेष्ठ नेत्यांनी त्यांच्या विरुद्ध ठोस अशी कारवाई करावी, अशी आमची मागणी आहे आणि अशी विकृती नेत्या बद्दल बोलण्याची ही महाराष्ट्रातून महाराष्ट्राच्या संस्कृतीला शोभेशी नाहीये. ही संस्कृती आपल्याला नाही शी करायची आहे आणि ती व्यक्तीला नव्हे तर त्याच्या विकृतीला आम्ही निषेध करीत आहोत. याबद्दल आम्ही वरिष्ठ नेत्याकडे आमचा मनोदय व्यक्त केलेला आहे. महाराष्ट्रचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांच्याकडे अशी मागणी करु अशा पध्दतीचे आमच्या नेण्याबद्दलचे वक्तव्य आम्ही सहन करणार नाही. यांच्या पुढे असे वक्तव्य केले तर आमची भावना तीव्र असेल त्यांनी दखल घ्यावी.
निषेध आंदोलन प्रसंगी जिल्हा उपाध्यक्ष रामचंद्र यावलकर, जिल्हा सरचिटणीस संतोष पाटील, ऍड. प्रल्हाद भिलारे, कल्याण ग्रामीण अध्यक्ष ऍड. ब्रम्हा माळी, ऍड. विनया पाटील, संजय राजपूत, रमेश दिनकर, नासीर खान, करुणा कातकडे, हरीचंद्र चन्ने, गोरख शिंदे, शरद गवळी, भगवान साठे व अन्य पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.