कोर्स एक आणि प्रमाणपत्र दुसरेच, शेकडो विद्यार्थ्यांची लाखो रुपयांची फसवणूक, अखेस संचालकास अटक

कल्याण पश्चिमेतील झुंजारराव संकुलात उ़डाण इन्स्टीट्यूट स्कीलींग प्रायव्हेट लिमिटेडतर्फे नर्सिंग कोर्स चालविला जात होता.

    कल्याण : सरकारी नर्सिंग होमच्या नावाखाली विद्यार्थ्यांची फसवणूक करणाऱ्या इन्स्टीट्यूट संचालकाला कल्याणच्या महात्मा फुले पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. वरुण झा असे या अटक करण्यात आलेल्या संचालकाचे नाव आहे. या प्रकरणातील अन्य दोन आरोपींच्या पोलीस शोध घेत आहे. विद्यार्थ्यांकडून ५२ लाख रुपये उकळण्यात आले हाेते. या प्रकारे फसवणूक झालेले अन्य विद्यार्थीही समोर येत आहेत.

    कल्याण पश्चिमेतील झुंजारराव संकुलात उ़डाण इन्स्टीट्यूट स्कीलींग प्रायव्हेट लिमिटेडतर्फे नर्सिंग कोर्स चालविला जात होता. काही दिवसांपूर्वी शिवसेना कल्याण पूर्वेचे शहर प्रमुख महेश गायकवाड या इन्स्टीट्यूट ३६ विद्यार्थ्यांसोबत कल्याणच्या महात्मा फुले पोलीस स्टेशनमध्ये पोहचले. पोलिसांना सांगितले गेले की, कशा प्रकारे विद्यार्थ्यांची फसवणूक केली गेली आहे. इन्स्टीटयूट द्वारे सांगितले गेले होते. त्यांच्याकडून सरकार मान्य कोर्स दिला जातो. इन्स्टीट्यूटकडून लाखो रुपयांची फी उकळली गेली. कोर्स एक आणि प्रमाणपत्र दुसरे दिले गेले. जनरल नर्सिंग मेडिफायरी हा कोर्स दिला जाणार असे सांगण्यात आले होते मात्र कोर्स संपल्यावर विद्यार्थ्यांना ॲडव्हान्स डिप्लोमा इन पेशंट केअर या कोर्सचे प्रमाणपत्र दिले गेले.

    विद्यार्थ्यांची फसवणूक झाल्याचे कळताच त्यांनी पोलीस ठाणे गाठले. डीसीपी सचीन गुंजाळ, एसीपी कल्याण जी घेटे आणि वरिष्ठ पोलीस निरिक्षक अशोक होनमाने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरिक्षक श्रीनिवास देशमुख पोलीस अधिकारी भिसे यांनी तपास सुरु केला. अखेर या प्रकरणात इन्सीटयूटचे संचालक वरुण झा याला अटक केली आहे. वरिष्ठ पोलीस निरिक्षक श्रीनिवास देशमुख यांनी सांगितले की, या प्रकरणी वरुण झाला अटक केली आहे. अन्य दोन आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत. आत्ता पर्यत ३६ विद्याथ्यांकडून ५२ रुपये घेतले आहेत. पुढील तपास सुरु आहे.