
ग्रामीण भागात खेळाडूंमध्ये उपजतच असलेल्या नैसर्गिक क्षमतेचा वापर त्यांच्या क्रीडा विकासासाठी करण्यासाठी शासनाने उचललेले पाऊल आहे.
कल्याण : क्रीडा व युवक सेवा संचालनालय पुणे यांच्या वतीने प्रत्येक जिल्हयात क्रीडा अधिकारी कार्यालय यांच्या मार्फत प्रत्येक वर्षी जिल्हास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धा आयोजित केल्या जातात. ठाणे ग्रामीण हा विभाग विशेषतः ग्रामीण भागातील खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी तसेच ग्रामीण भागातील खेळाडूंना संधी उपलब्ध करून देण्यासाठी वेगळा निर्माण करण्यात आलेला आहे. ग्रामीण भागात खेळाडूंमध्ये उपजतच असलेल्या नैसर्गिक क्षमतेचा वापर त्यांच्या क्रीडा विकासासाठी करण्यासाठी शासनाने उचललेले पाऊल आहे.
टिटवाळा येथील विनायक मार्शल आर्टस् आणि फिटनेस झोनचे संचालक राज्य युवा पुरस्कार विजेते विनायक कोळी यांच्या वतीने टिटवाळा तसेच आसपासच्या ग्रामीण भागात खेळाडूंमध्ये आर्चरी या खेळाचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी आर्चरी (धनुर्विद्या) या खेळाचे ठाणे ग्रामीण शालेय क्रीडा स्पर्धा टिटवाळा येथे आयोजित करण्यात आली. सेंट थॉमस स्कूल रुंदे टिटवाळा येथे जिल्हास्तरीय आर्चरी स्पर्धा मोठ्या उत्साहात पार पडली. या स्पर्धेसाठी ठाणे ग्रामीण विभागातील विविध शाळांतील खेळाडूंनी हजेरी लावली होती. सदर स्पर्धेसाठी पंच म्हणून टिटवाळा येथील आर्चरी प्रशिक्षक हरीष वायदंडे उपस्थित होते त्यांनी आर्चरी या खेळाविषयी सर्व खेळाडूंना मार्गदर्शन केले. स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी सेंट थॉमस शाळेचे क्रीडा शिक्षक मिलिंद यांच्या हस्ते नारळ फोडून तसेच शाळेच्या प्रतिनिधी प्रियांका यांच्या हस्ते आर्चरी च्या क्रीडा साहित्याची पुजा करून स्पर्धेची सुरवात करण्यात आली.
हि क्रीडा स्पर्धा यशस्वीरीत्या आयोजीत करण्यासाठी सेंट थॉमस शाळेचे संचालक अशोक साळवी तसेच मुख्याध्यापिका साळवी यांनी शाळेचे क्रीडांगण उपलब्ध करून दिले. तसेच आर्चरी खेळाडू विनोद गायकर, अल्पेश गायकर, संदीप इंदप, महेश म्हात्रे आणि प्रथमेश यांनी या स्पर्धेसाठी मोलाचे सहकार्य केले. टिटवाळा येथे आर्चरी क्रीडा प्रशिक्षण नियमीतपणे सूरू असुन अनेक खेळाडूंनी या प्रशिक्षणाचा लाभ घ्यावा असे आवाहन विनायक कोळी यांनी केले.