
डोंबिवली पश्चिमेकडील प्रसिद्ध असलेल्या एस एच जोंधळे विद्यामंदिर शाळेत निर्दयी शिक्षिकेने केलेल्या कृत्यानंतर शहरात एकच खळबळ उडाली आहे.
डोंबिवली : डोंबिवलीतील एस एच जोंधळे विद्यामंदिर शाळेतील धक्कादायक प्रकार उघडकीस आला. एका शिक्षिकेने २० ते २५ मुलांना लाकडी पट्टी आणि स्टीलच्या पट्टीने हातावर बेदम मारहाण केली. या मारहाणीत मुलांच्या अंगावर वळ उठले तर काही मुलांना दुखापत देखील झाली. निलम भारमळ असे या निर्दयी शिक्षिकेचे नाव आहे. या घटनेनंतर संतप्त पालकांनी आज जोंधळे शाळेत जाऊन मुख्याध्यापिकांना जाब विचारला. शिक्षिकेवर कारवाई करण्याची मागणी केली या प्रकरणी पोलीस ठाण्यात देखील तक्रार देणार असल्याचे पालकांनी सांगितलं. याबाबत शाळा प्रशासनाने अत्यंत दुर्दैवी घटना आहे आम्ही पालकांची माफी मागतो, पुढे अशा घटना होणार नाहीत याची दक्षता घेऊ, संबंधित शिक्षिकेवर निलंबनाची कारवाई करण्यात आल्याचे सांगितले .
डोंबिवली पश्चिमेकडील प्रसिद्ध असलेल्या एस एच जोंधळे विद्यामंदिर शाळेत निर्दयी शिक्षिकेने केलेल्या कृत्यानंतर शहरात एकच खळबळ उडाली आहे. नीलम भारमळ असे शिक्षिकेचे नाव असून तिने पाचवी सहावी इयत्तेत शिकणाऱ्या २० ते २५ विद्यार्थ्यांना लाकडी पट्टी आणि स्टीलच्या पट्टीने बेदम मारहाण केली. ही शिक्षिका नीट शिकवत नसल्याचे तक्रार तीन दिवसांपूर्वी पालकांनी शाळेकडे केली होती. याचाच राग मनात धरून तिने विद्यार्थ्यांना मारल्याचा पालकांनी आरोप केला आहे. या घटनेनंतर पालकांनी आज शाळा प्रशासनाला या प्रकरणाचा जाब विचारला तसेच संबंधित शिक्षिकेवर कठोर कारवाईची मागणी केली. या शिक्षिकेच्या विरोधात पोलीस ठाण्यात देखील तक्रार करणार असल्याचे पालकांनी सांगितले .
विशेष म्हणजे नीलम या तीन ते चार दिवसांपूर्वीच या शाळेचे शिक्षिका म्हणून रुजू झाल्या होत्या. तर याबाबत शाळा प्रशासनाने पालकांचे माफी मागितली तसेच असे प्रकार इथून पुढे घडणार नाहीत याची दक्षता घेण्यात येणार असल्याचे सांगितलं. संबंधित शिक्षिका नीलम भारमल हिला निलंबित करण्यात आल्याची माहिती शाळा प्रशासनाने दिली आहे.