
डोंबिवली पूर्वेकडून ग्रामीण भागात सदर पीडित १४ वर्षीय अल्पवयीन मुलगी आई व सावत्र वडिलांसोबत राहते. तिच्या सावत्र वडिलांच्या भावाची या अल्पवयीन पीडितेवर वाईट नजर होती.
कल्याण – डोंबिवली : डोंबिवली ग्रामीण भागात काका पुतणीच्या नात्याला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. १४ वर्षीय अल्पवयीन मुलीवर सावत्र वडिलांच्या भावानेच लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी मानपाडा पोलिसांनी नराधम काकाला बेड्या ठोकल्या आहेत.
डोंबिवली पूर्वेकडून ग्रामीण भागात सदर पीडित १४ वर्षीय अल्पवयीन मुलगी आई व सावत्र वडिलांसोबत राहते. तिच्या सावत्र वडिलांच्या भावाची या अल्पवयीन पीडितेवर वाईट नजर होती. गेल्या वर्षभरापासून हा नराधम तिच्यावर लैंगिक अत्याचार करत होता. याबाबत कोणाला सांगितलं तर तुला सोडणार नाही अशी धमकी या नरधमाने पिडितेला दिली होती. त्रास असह्य झाल्याने पीडीतेने याबाबत आपल्या आईला माहिती दिली. या प्रकरणी पीडीतेने मानपाडा पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली असून या तक्रारीनुसार पोलिसांनी या नराधमाला बेड्या ठोकल्या आहे.