कल्याणमध्ये शिव भीम मिठाई मावा खवा आणि व्यापारी कामगार संघटनेचा नवा उपक्रम

या कार्यक्रमात सिल प्याक स्पेशलबर्फी, खवा, हरियाली, मिल्ककेक, सर्व साधारण दुकानातील मिक्स मिठाई ठेवण्यात आली.

    कल्याण : सध्या नवरात्रोत्सवाची धूम सुरू असून दसरा आणि आगामी दिवाळी सण लक्षात घेता मोठ्या प्रमाणात नागरिक मिठाई तसेच खवा खरेदी करत असतात. ही मिठाई खरेदी करताना कशाप्रकारे खबरदारी घ्यायला हवी याबाबत कल्याण शिव भीम मिठाई मावा खवा व ट्रान्सपोर्ट चालक मालक व्यापारी कामगार संघटनेच्या वतीने ग्राहक व्यापारी यांच्या माहितीसाठी जन जागृती कार्यक्रम घेण्यात आला.

    या कार्यक्रमात हिंदू सणासुदीला रक्षा बंधन, गणेशोत्सव, नवरात्रोत्सव, दसरा, दिवाळी निमित्त मिठाई, खवा, हरियाली, स्पेशलबर्फी, मिल्ककेक यांची मोठ्या प्रमाणात होणारी विक्री त्यांवर वारंवार होणारी चूकीची गैरसमजुतीची कार्यवाही स्पेशल बर्फी बद्दल ओळख ती बर्फीच खवा असल्याचे गैरसमज, त्याची पॅकिंग बाबत माहिती तसेच भेसळयुक्त खवा ओळख त्यातील फरक, दुधाच्या वस्तूत भेसळ आहे की नाही हे आयोडीन टिंनचर याचा वापर करून कसे ओळखायचे, ग्राहक दुकानदार व्यापारी कामगार यांनी काय काळजी घ्यावी या बाबत लाईव्ह व्हिडिओ व प्रक्रिया करून दाखविण्यात आली.

    या कार्यक्रमात सिल प्याक स्पेशलबर्फी, खवा, हरियाली, मिल्ककेक, सर्व साधारण दुकानातील मिक्स मिठाई ठेवण्यात आली. सदर दुग्धजन्य पदार्थ याला आयोडिन लाऊन त्याचा असणारा रंग तसेच त्याच पदार्थ मध्ये मैदा, कॉनफ्लोर, बटाटा, शिंगाडा पिठ, रवा मिक्स करून बदली होणारा रंग त्याने भेसळ ओळख दाखविण्यात आली. या कार्यक्रमात कल्याण मुरबाड जिल्हा प्रमुख अरविंद मोरे, अध्यक्ष सागर पगारे, उप अध्यक्ष लखपत सिंह रजपूत, खजिनदार राजा जाधव, उप अध्यक्ष रवी खंडेलवाल, सह सचिव राम दुलारे, व्यापारी रियाज सय्यद, गौतम गुरजर, सेवाराम बघेल, केशव सिंह, लालसिंह राजपुत, सुनील बघेल, दाताराम राजपुत, खंडेलवाल इतर सर्व व्यापारी उपस्थित होते. आभार व कार्यक्रमाची माहिती सचिव जयदीप सानप यांनी दिली.