फिल्मी स्टाईलने पकडून, पोलिसांनी काढली भाईची वरात

कल्याण पूर्वेत गंभीर स्वरुपाच्या गुन्हेगारीच्या घटना घडत आहेत. धक्कादायक घटनांमध्ये अल्पवयीन मुलांचा समावेश असतो. त्यामुळे पोलिसांना देखील कारवाई करताना अडचणी येतात.

    कल्याण : सर्व सामान्य माणसांना नाहक त्रास देणाऱ्याला, भर रस्त्यात तरुणांना मारणारा करणारा आणि रात्री गोंधळ करणारा कल्याण पूर्वेतील सराईत गुन्हेगार रुपेश कनोजिया हा अखेर पोलिसांच्या ताब्यात सापडला आहे. अनेक गुन्ह्यात फरार असलेल्या कनोजिया याची दशहत कमी करण्यासाठी त्याची त्याच परिसरातून वरात काढण्यात आली.

    कल्याण पूर्वेत गंभीर स्वरुपाच्या गुन्हेगारीच्या घटना घडत आहेत. धक्कादायक घटनांमध्ये अल्पवयीन मुलांचा समावेश असतो. त्यामुळे पोलिसांना देखील कारवाई करताना अडचणी येतात. परंतू पोलिसांसमोर गुन्हे कमी करण्याचे आव्हान आहे. या पार्श्वभूमीवर कल्याणचे सहाय्यक पोलीस आयुक्त कल्याणजी घेटे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरिक्षक राजेश शिरसाट यांनी पावले उचलली आहे. सराईत गुन्हेगारांचा बिमोड करण्यासाठी विविध पथके तयार करण्यात आली आहेत. कल्याण पूर्वेतील सराईत गुन्हेगार रुपेश कनोजिया एका ठिकाणी एका व्यक्तिला मारहाण करीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.

    वरिष्ठ पोलीस निरिक्षक राजू शिरसाट यांच्या सूचनेनुसार पोलीस पथक तातडीने त्याठिकाणी दाखल झाले. रुपेश हा पळून जाण्याच्या तयारीत होता. त्याला चारही बाजूने घेरले. त्याला अटक केली. २०२१ पासून रुपेश याने गुन्हे करण्यास सुरुवात केली. त्याच्या विरोधात गंभीर स्वरुपाचे आठ गुन्हे दाखल आहेत. त्याच्या विरोधात लूटीचे गुन्हे दाखल आहेत. पोलिसांनी त्याला कल्याण न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे. रुपेशच्या विरोधात तडीपारीची आणि एमपीडीए कारवाई प्रस्तावित केली जाईल असे पोलिसांनी सांगितले.