kalyan irani woman arrest

कल्याणजवळ आंबिवली परिसरातील इराणी वस्तीत एक महिला एम डी ड्रग्जसह चरस विक्री करत असल्याची माहिती कल्याण खडकपाडा पोलिसांना मिळाली होती.

    कल्याण: अंमली पदार्थाची (Narcotics) विक्री कल्याणमध्ये (Kalyan) मोठ्या प्रमाणात वाढली आहे. याविरोधात पोलिसांनी कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. कल्याणच्या आंबिवली भागातील इराणी वस्तीमधून याप्रकरणी इराणी ड्रग लेडीला अटक करण्यात पोलिसांना यश आलं आहे. कल्याणच्या खडकपाडा पोलिसांनी (Khadakpada Police) ही कारवाई केली आहे. सबा सैय्यद असं या महीलेचं नाव असून ती कल्याणच्या आंबिवली, मोहने परिसरात एम डी ड्रग्जसह चरस विक्री करत असल्याचं समोर आलं आहे.

    छापा टाकून इराणी ड्रग लेडीला घेतलं ताब्यात
    कल्याणजवळ आंबिवली परिसरातील इराणी वस्तीत एक महिला एम डी ड्रग्जसह चरस विक्री करत असल्याची माहिती कल्याण खडकपाडा पोलिसांना मिळाली होती. मिळालेल्या माहितीच्या आधारे मंगळवारी कल्याण खडकपाडा पोलिसांच्या पथकाने रात्रीच्या सुमारास आंबिवली परिसरात इराणी वस्तीत छापा टाकून एका महिलेला ताब्यात घेतलं. या महिलेची चौकशी केली असता तिच्याकडे एमडी ड्रग्ससह चरसचा साठा आढळला आहे.

    सबा सैयदकडून अंमली पदार्थ जप्त
    सबा सैय्यद असं या महिलेलं नाव आहे. ती इराणी वस्तीत राहते. पोलिसांनी तिच्याकडून एम डी ड्रग्जसह चरस हस्तगत केलंय. सबा कल्याणच्या आंबिवली, मोहने परिसरात एम डी ड्रग्जसह चरस विक्री करत असल्याची माहिती पोलीस तपासात समोर आली आहे. तिने एमडी ड्रग्स आणि चरस कुठून आणले आणि ती कोणाला याची विक्री करत होती अशा सगळ्या बाबींचा पोलीस तपास करत आहेत.