कल्याण लोकसभा मतदारसंघातील लढाई शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष विरुद्ध अपक्ष; वरुण सरदेसाई यांनी श्रीकांत शिंदेंचा उल्लेख टाळला

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षविरुद्ध अपक्ष अशी लोकसभेतील लढाई आहे. यावर आता ठाकरे गटाचे नेते वरूण सरदेसाई यांनी मत व्यक्त केले.

    कल्याण – महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये जोरदार राजकीय लढत सुरु आहे. कल्याण लोकसभेसाठी शिंदे गटाकडून अद्याप उमेदवार घोषित झालेला नाही. त्यामुळे महाविकास आघाडीकडून जहरी टीका केली जात आहे. त्यामुळे सध्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षविरुद्ध अपक्ष अशी लोकसभेतील लढाई आहे. यावर आता ठाकरे गटाचे नेते वरूण सरदेसाई यांनी मत व्यक्त केले.

    कल्याण लोकसभा मतदारसंघासाठी महायुतीकडून अदयाप घोषणा करण्यात आलेली नाही. महायुतीकडून अद्यापही उमेदवार घोषित झालेला नाही,त्यामुळे आजच्या घडीला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षविरुद्ध अपक्ष अशी लोकसभेतील लढाई आहे. असा टोला वरुण देसाई यांनी लगावला. पुढे ते म्हणाले, “जनता आमच्या पाठीमागे आहे,मशाल चिन्ह घरोघरी पोहोचवले पाहिजे याकरिता संपूर्ण महाराष्ट्रात प्रयत्न करत आहोत. उद्धव ठाकरेंच्या प्रति संपूर्ण महाराष्ट्रात प्रचंड सहानुभूती, लोकप्रियतेचे लाट आहे, त्या लाटेवर आमचा विश्वास आहे आणि आम्ही परत एकदा जिंकू,” असा विश्वास वरुण देसाई यांनी व्यक्त केला आहे.

    महिला विरुद्ध धनशक्ती मसल पॉवर अशी ही लढत

    पुढे ते म्हणाले, “उद्धव ठाकरे यांनी सामान्य घरातील महिलेला उमेदवारी दिली आहे. वैशाली दरेकर या कमी वयात नगरसेविका म्हणून निवडून आल्या आहेत. तसेच कल्याण-डोंबिवली महापालिकेत विरोधी पक्षनेते म्हणून काम केले आहे. सामान्य महिला विरुद्ध धनशक्ती मसल पॉवर अशी ही लढत होणार आहे. कल्याण लोकसभेतील जनता ही निष्ठावंत वैशाली दरेकर यांच्या सोबत उभी राहणार आहे.आमच्या पक्षात कोणीही नाराज नसून नाराजी असेल तर ते दूर करण्यात येईल” असे देखील मत वरुण देसाई यांनी व्यक्त केले.