पिंपरी गाव नागरी समस्यांच्या विळख्यात , समस्या सोडविण्याचे मनसे आमदार राजू पाटील यांचे आश्वासन

कल्याण ग्रामीणमधील पिंपरी हे गाव आहे. कोयना धरण ग्रस्तांचे या गावात पुनर्वसन करण्यात आले होते. मात्र या गावात सोयी सुविधांची वाणवा आहे.

    कल्याण ग्रामीण : गावात वीज पुरवठा सुरळीत नाही. पाण्याची समस्या आहे. समाज कंटकांना हातीशी घेऊन भंगाराची गोदामे सुरु आहेत. त्यामुळे प्रदूषणाच्या समस्येने ग्रामस्थ हैराण आहेत. पिंपरी गावात नागरीकांची समस्या ऐकण्यासाठी मनसे आमदार राजू पाटील यांनी पिंपरी गावातील गावकऱ्यांची भेट घेतली. लवकरात लवकर ही समस्या कशी सुटणार यासाठी प्रयत्न केला जाईल असे मनसे आमदार राजू पाटील यांनी गावकऱ्यांना आश्वासीत केले आहे.

    कल्याण ग्रामीणमधील पिंपरी हे गाव आहे. कोयना धरण ग्रस्तांचे या गावात पुनर्वसन करण्यात आले होते. मात्र या गावात सोयी सुविधांची वाणवा आहे. गावातील वीज पुरवठा वारंवार खंडीत होतो. पाण्याची समस्या आहे. पाण्यासाठी पाणी शिखर समिती होती. त्या समितीत भ्रष्टाचार झाल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. या परिसरात भंडार्ली डंपिंग ग्राऊंड लादण्यात आले आहे. तसेच भंगारची गाेदामे आहे. एकतर डंपिंगमुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात आले आहे. तसचे भंगार गोदामुळे प्रदूषणाच्या समस्येन ग्रामस्थ बेजार झाले आहे. या गावात मनसे आमदार राजू पाटील यांनी जाऊन प्रत्यक्ष भेट दिली. तसेच ग्रामस्थांशी संवाद साधला. गावातील महिला आणि पुरुष मंडळीकडून गावातील समस्या काय आहेत. हे जाणून घेतली.

    या बाबत मनसे आमदार राजू पाटील यांनी सांगितले की, पिंपरी गावात कोयना धरणग्रस्तांचे पुनर्वसन करण्यात आले होते. या गावात स्वत: मुख्यमंत्री देखील सहा महिने राहिले आहेत. मात्र गावातील वीज पुरवठा वारंवार खंडीत होतो. तसेच पाण्याची समस्या भेडसावत आहे. पाणी पुरवठ्यासाठी पाणी शिखर समिती आहे. या समितीमध्ये भ्रष्टचार असल्याने ही समितीच बरखास्त करण्यात यावी. पाणी पुरवठ्याचे योग्य प्रकारे नियोजन केले जावे. नागरीकंना सुरळित पाणी आणि वीज पुरवठा व्हावा याकरीता प्रयत्न करणार आहे. तसेच प्रदूषणाला कारणीभूत असलेली गोदामे हटविण्याची मागणी करणार आहे असे आश्वासन आमदार पाटील यांनी गावकऱ्यांना दिले आहे.