प्रेमाला मुलीच्या घरांच्याचा विरोध असल्यामुळे, रेल्वेच्या सिग्नलला लटकून कल्याणमध्ये तरुणाने केली आत्महत्या

कल्याण रेल्वे पोलिसांनी या तरुणाचा मृतदेह ताब्यात घेतला. मृतदेह शव विच्छेदनाकरीता महापालिकेच्या रुक्मीणीबाई रुग्णालयात पाठविण्यात आला आहे.

    कल्याण : कल्याण (Kalyan) शहाड (Shahad) रेल्वे स्थानका दरम्यान एका तरुणाने रेल्वेच्या सिग्नलला लटकून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना कल्याणमध्ये घडली आहे. विकास काटे असे या आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे नाव आहे. तो सहा दिवसापासून घरातून बेपत्ता होता. विकास नाशिक येथील येवला या ठिकाणचा राहणार होता. प्रेमसंबंधास मुलीच्या घरच्या लोकांचा विरोध असल्याने विकास याने आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली आहे.

    कल्याण जवळ असलेल्या रेल्वे लोकोशेड परिसरात रेल्वेच्या सिग्नला एका तरुणाचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत आढळला अशी माहिती मंगळवारी २२ ऑगस्ट रोजी रात्री पोलिसांना मिळाली. कल्याण रेल्वे पोलिसांनी या तरुणाचा मृतदेह ताब्यात घेतला. मृतदेह शव विच्छेदनाकरीता महापालिकेच्या रुक्मीणीबाई रुग्णालयात पाठविण्यात आला आहे. विकास काटे (Vikas kate) असे या आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव होते. कल्याण रेल्वे पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरु केला. तर अशी माहिती मिळाली विकास हा नाशिक जिल्ह्यातील येवला तालुक्यात राहतो. तो सहा दिवसापासून घरातून बेपत्ता होता.

    घरातील लोकांनी स्थानिक पोलीस स्थानकात तक्रार केली होती. या बाबत पोलिसांनी सांगितले की, विकास हा एका मुलीच्या प्रेमात होता. मात्र मुलीच्या घराच्या मंडळीचा त्याला विरोध होता. त्यामुळे तो मानसिकदृष्टया खचला होता. त्यातून त्याने आत्महत्या केल्याचे सांगण्यात येत आहे. सध्या हे प्रकरण येवला पोलिस स्थानकात वर्ग केले जाणार आहे. स्थानिक पोलिस या प्रकरणाचा तपास करणार आहे. विकास हा शिक्षण घेत होता.