कल्याणकरांसाठी खूष खबर; नागपूरच्या धर्तीवर कल्याण-शीळ रोड डबल डेकर करणार; श्रीकांत शिंदे यांची माहिती

कल्याणची मेट्रोही तळोजापर्यंत जाणार आहे. ती जर या ब्रिजबरोबर एकत्र केली तर या ठिकाणी मेट्रोला ही पर्याय होईल, त्याचबरोबर शिळफाटा ते रांजनोली पूर्ण रस्ता असेल ज्या ठिकाणी भविष्यात कल्याण-डोंबिवलीकरांना ट्रॅफिकचे समस्यांमध्ये जावा लागणार नाही, या दृष्टिकोनातून पुढचा वीस वर्षाचा विचार करून हा रस्ता प्रस्तावित केलेला आहे, असे खासदार शिंदे यांनी सांगितले.

    मुंबई : वाढती लोकसंख्या पाहता नागपूरच्या धर्तीवर कल्याण शीळ रोड डबल डेकर (Kalyan Sheel Double Decker) करण्याचा प्रस्ताव सादर करणार असल्याची माहिती खासदार श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) यांनी दिली. याबाबत खासदार श्रीकांत शिंदे यांनी कल्याण शीळ रोड पूर्ण रस्ता काँक्रिट केला आहे; मात्र वाढती लोकसंख्या पाहता भविष्यात हा देखील रस्ता कमी पडणार आहे. या उद्देशाने मुख्यमंत्र्यांना नागपूरला जसा डबल डेकर रस्ता केला, म्हणजेच खाली रस्ता त्यावर फ्लायओव्हर त्यावर मेट्रो (Metro) केला आहे. तसेच, कल्याण शीळ रोडवर देखील करा, अशी मागणी केली आहे.

    कल्याणची मेट्रोही तळोजापर्यंत जाणार आहे. ती जर या ब्रिजबरोबर एकत्र केली तर या ठिकाणी मेट्रोला ही पर्याय होईल, त्याचबरोबर शिळफाटा ते रांजनोली पूर्ण रस्ता असेल ज्या ठिकाणी भविष्यात कल्याण-डोंबिवलीकरांना ट्रॅफिकचे समस्यांमध्ये (Traffic Problem) जावा लागणार नाही, या दृष्टिकोनातून पुढचा वीस वर्षाचा विचार करून हा रस्ता प्रस्तावित केलेला आहे, असे खासदार शिंदे यांनी सांगितले.

    डोंबिवलीतील १२ रस्त्यांचे भूमिपूजन खासदार श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण (Ravindra Chavan) उपस्थित होते. यावेळी श्रीकांत शिंदे यांनी कल्याण-डोंबिवलीत पुढील पावसाळ्यापर्यंत जास्तीत जास्त रस्ते काँक्रीटचे होतील. एमआयडीसीमध्ये एकाच प्रभागात १०० कोटींचे निधी दिलाय. सरकार सर्वसामान्यांसाठी काम करत आहे, त्यामुळे रस्त्याच्या कामात गुणवत्तेबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नाही आणि सहन देखील जाणार नाही, असा इशाराही श्रीकांत शिंदे यांनी दिला.