
कल्याण पश्चिमेकडे वसंत व्हॅली येथील रस्त्यांच्या काँक्रिटीकरणाचे भूमिपूजन भाजपचे केंद्रीय पंचायत राजमंत्री कपिल पाटील यांच्या हस्ते झाले.
कल्याण : सुनील तटकरेंची खासदारकी रद्द करण्याची सुळेंची मागणी तर तटकरेंकडूनही सुळेंची लोकसभेच्या अध्यक्षांकडे तक्रार करण्यात आली आहे. याबाबत केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांनी ते कशासाठी राजीनामा मागतायत हे मला माहित नाही. मात्र आता एकत्र राहिलेले कार्यकर्ते दोन महिन्यात एकमेकांचे राजीनामा मागायला लागले आहेत असा चिमटा काढला. पुढे बोलताना त्यांचं काय चाललंय त्यांनाच माहित मला माहित नाही अस सांगितले. केंद्रीय पंचायत राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या हस्ते कल्याण पश्चिमेत काही विकास कामाचा भूमिपूजन कार्यक्रम पार पडला. यावेळी पाटील यांनी विविध मुद्द्यांवर प्रतिक्रिया दिली आहे.
केंद्रीय पंचायत राज्यमंत्री कपिल पाटील आज कल्याणमध्ये होते त्यांच्या हस्ते विविध विभागात कामांचा भूमिपूजन कार्यक्रम पार पडला यावेळी माजी आमदार नरेंद्र पवार, पक्षाचे जिल्हा सचिव प्रेमनाथ म्हात्रे शहर अध्यक्ष वरून पाटील स्थानिक नगरसेवक सुनील वायले, सौरव गनत्रा विक्की गनत्रा, नगरसेवक दया गायकवाड उपस्थित होते.
माझ्या डोळ्यासमोर माझा मुलगा मुख्यमंत्री व्हावा अशी इच्छा अजित पवार यांच्या आईनं व्यक्त केली होती. याबाबत बोलताना केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांनी, प्रत्येक आईला असं वाटतं की माझा मुलगा मोठा व्हावा पण त्यांना काय वाटत काय नाही त्यांचे उत्तर शेवटी ते देऊ शकतात, मी भाजपचा एक सामान्य कार्यकर्ता आहे, आमच्या नेत्याने अनेकदा सांगितलं प्रत्येक पक्षाला पक्ष मोठा करण्याचा अधिकार आहे, प्रत्येक पक्षाच्या कार्यकर्त्याला त्यांच्या नेत्याने मुख्यमंत्री व्हाव असं बोलण्याचा अधिकार आहे. देशामध्ये लोकशाही आहे, लोकशाहीमध्ये कोणीही कोणतेही पद मिळवण्यासाठी इच्छा व्यक्त करू शकतो असं सांगितले.
शेतकऱ्यांचं काय नुकसान झालं, शेतकऱ्यांना कसा फायदा होईल याचा विचार सरकार निश्चितपणे करेल, केंद्रीय मंत्री कपिल पाटील केंद्र सरकारनं कांद्याचे भाव कमी होण्यासाठी निवडणुका असलेल्या राज्यांमध्ये कांदा वितरण सुरु केलंय, परिणामी राज्यातला कांदा उत्पादकाचं नुकसान झालं आहे. याबाबत बोलताना कपिल पाटील यांनी राज्यांमध्ये होणाऱ्या निवडणुका हा विषय घेऊन कधीच प्रधानमंत्री मोदीजी काम करत नाही. कंज्युमर एपीयर मिनिस्ट्रीच्या वतीने निम्म्या किमतीमध्ये भारत दाल याचं वितरण संपूर्ण देशात सुरू झाले. 2014 ला नरेंद्र मोदी यांनी शपथ घेतली तेव्हा त्यांनी सांगितलं की माझं सरकार गरिबांप्रति समर्पित आहे. गरिबांसाठी त्यांनी अनेक योजना आणल्यात. गरिबांच्या प्रति समर्पित सरकार चालवणारे प्रधानमंत्री नव्हे तर प्रधान सेवक नरेंद्र मोदी आहेत, त्यामुळे कांद्याचे भाव कुठे कमी केले, कुठे वितरित केला निवडणुका आहेत. तिकडे वितरित केला तसं नाही तर वितरण संपूर्ण देशासाठी आहे, यामुळे शेतकऱ्यांचं काय नुकसान झाले, शेतकऱ्यांचा कसा फायदा होईल याचा निश्चितपणे सरकार विचार करेल असे सांगितले.
कल्याण पश्चिमेकडे वसंत व्हॅली येथील रस्त्यांच्या काँक्रिटीकरणाचे भूमिपूजन भाजपचे केंद्रीय पंचायत राजमंत्री कपिल पाटील यांच्या हस्ते झाले. यावेळी बोलताना कपिल पाटील यांनी महापालिकेवर कोणताही आर्थिक हृदंड भरता ६० कोटींचा रस्ता या ठिकाणी काँक्रिटीकरण करण्यात येणार आहे. नगर विकास खात्याच्या योजनेमधून हा रस्ता होणार आहे. टीडीआरच्या मोबदल्यात अशा प्रकारचे रस्ते खाजगी व्यक्तीकडून करून घेऊ शकतो त्या मोबदल्यात संबंधित व्यक्तीला टीडीआर दिला जातो .ही अत्यंत सोपी व उपयुक्त पद्धत आहे शहरातील इतर रस्त्यांबाबत ही पद्धत वापरण्याची चाचपणी सुरू केली आहे असे केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांनी सांगितले.