
मराठा आरक्षण संदर्भात काल सर्वपक्षीय बैठक संपन्न झाली. या बैठकीत मनसे आमदार राजू पाटील यांनी देखील मराठा आरक्षणाला समर्थन दिलं आहे.
कल्याण : स्टेशन परिसरासह लोढा पलावा परिसरात फेरीवाले आहेत. त्यांच्या विरोधात क्रिमिनल केसेस दाखल करा यामध्ये सर्वच फेरीवाले गरीब आहेत. असं नाही असामाजिक तत्त्व देखील यामध्ये घुसलेत जे खरच फेरीवाले आहेत त्यांना जागा द्या त्यांना आमचा विरोध नाही मात्र जे वारंवार लोकांवर अधिकाऱ्यांवर हल्ले करतात त्यांच्यावर कारवाई करा अशी मागणी पालिका आयुक्तांकडे केल्याचे आमदार राजू पाटील यांनी सांगितले. मनसे आमदार राजू पाटील यांनी आज महापालिका मुख्यालयात पालिका आयुक्त भाऊसाहेब दांगडे यांची भेट घेत विविध समस्यांबाबत चर्चा केली. याबाबत बोलताना मनसे आमदार राजू पाटील यांनी पलावा येथील रहिवाशांना मालमत्ता करत ६६ टक्के सवलत देण्याचा निर्णय घेतल्याबद्दल आयुक्तांचा अभिनंदन केलं. या परिसरातील नागरिकांना टॅक्स कसा लावण्यात येईल, त्यांना टॅक्स कसा येईल याबाबत जनजागृती शिबिर घेण्याचे मागणी महापालिका आयुक्तांकडे केली आहे. मानकोली पुलाची अलाइनमेंट चुकली, तांत्रिक कारणामुळे हा पूल पुढे उतरवण्यात आला आहे त्याचं नियोजन कसं करणार, ठाकुर्लीच्या रखडलेल्या पुलाबाबत पुढे काय करणार याबाबत चर्चा केली. महापालिका आयुक्तांनी मानकोली पुलाबाबत एमएमआरडीए सोबत पुन्हा बैठक घेणार असल्याचे सांगितले तर ठाकुर्ली पुलाबाबत लाभार्थ्यांना मोबदला देण्याचा निश्चित झाले तेही काम सुरू करण्यात येईल असा आश्वासन दिल्याचे पाटील यांनी सांगितले.
डोंबिवली पश्चिम येथे जवळपास एक लाखांच्या आसपास घर आहेत. मात्र या ठिकाणी महावितरणाचे सब स्टेशन नाही. डोंबिवली पूर्वेकडून पश्चिमेत कोपर पुलावरून जाणारी केबल जर तुटली तर संपूर्ण डोंबिवली पश्चिम अंधारात जाईल. त्यामुळे महापालिकेने महावितरणच्या सबस्टेशनसाठी डोंबिवली पश्चिममध्ये भूखंड उपलब्ध करून द्यावा भूखंड नसेल तर आरक्षण बदलून तो भूखंड महावितरणला द्यावा अशी मागणी आयुक्त भाऊसाहेब दांगडे यांच्याकडे केल्याचे आमदार राजू पाटील यांनी सांगितले यावेळी आयुक्तांनी हे महावितरणला भूखंड देण्याबाबत सकारात्मक प्रतिसाद दिल्याचे सांगितले यावेळी डोंबिवलीचे मनसे शहरप्रमुख राहुल कामत हे देखील उपस्थित होते.
मराठा आरक्षण संदर्भात काल सर्वपक्षीय बैठक संपन्न झाली. या बैठकीत मनसे आमदार राजू पाटील यांनी देखील मराठा आरक्षणाला समर्थन दिलं आहे. या बैठकीबाबत बोलताना मनसे आमदार राजू पाटील यांनी पुन्हा सरकारला लक्ष केलं आहे. या बैठकीत सरकार स्पष्ट काय बोलायला तयार नव्हते, बरं बरं बोललं जात होतं मात्र खरं खरं बोललं जात नव्हतं असा खोचक टोला सरकारला लगावला. मराठा आरक्षणाबाबत झालेल्या बैठकीबाबत बोलताना आमदार राजू पाटील यांनी सरकारच्या अंगाशी आल्याशिवाय ते सर्व पक्षीय बैठक बोलवत नाहीत, त्यांच्या अंगाशी आलं की त्यांना आमचे खांदे पाहिजे असतात, महाराष्ट्र हिताचा विचार करून सगळे एकत्र येतात, त्यांनी ही गोष्ट ४० दिवसांपूर्वी सांगायला पाहिजे होती, तांत्रिक बाबी लोकांना समजून सांगा.
सरकार बसवणं, उठवणं, पळवा पळवी याच्यातच वेळ गेलाय. मराठा समाजाला सत्य परिस्थिती सांगावी, काही गोष्टी न्यायालयाकडून होणार आहेत, काही प्रशासकीय बाबी आहेत, मराठ्यांना आरक्षण दिल्यानंतर ते टिकले पाहिजे या सगळ्या गोष्टींचा चारही बाजूने विचार केला पाहीजे. सरकार आता सकारात्मक चाललेय, त्यांनी सरकारला वेळ दिला पाहिजे आपल्या जीवाशी खेळ न करता समजूतदारपणाची भूमिका घेऊन त्यांनी पुढे चालले तर मराठी आरक्षण मिळायला काही अडचण होणार नाही, यासाठी वेळ जाईल हे सरकारने सांगायला पाहिजे, मराठी समाजाला विश्वासात घ्यायला पाहिजे असे सांगितलं. पुढे बोलताना इतके वर्ष गेले तर थोडं एक पाऊल मागे घेऊन समजूतदारपणा दाखवून संयम ठेवायला पाहिजे असं आवाहन मराठा समाजाला केलं.