कल्याण पश्चिमेत सर्पमित्राने एका विषारी सापांसह तीन बिन विषारी सापांना पकडून दिले जीवदान

वाडेघर हिऱ्याचा पाडा लुल्ला कॉम्प्लेक्स फेज टू मध्ये परिसरातून दोन धामण प्रजातीच्या सापांना सर्पमित्र दत्ता बोंबे यांनी पकडून जीवदान देत उपस्थितीत लोकांमध्ये धामण प्रजातीसाप बिन विषारी असून तो आपल्या भक्ष्य उंदीराच्या मागावर येत असल्याबाबत माहिती देत जनजागृती केली.

  • एक विषारी घोणस सह दोन धामण, एक कुकरी बिन विषारी सापांचा समावेश

कल्याण :- कल्याण पश्चिमेत (Kalyan West) सर्पमित्राने रविवारी नागरी वस्तीतून एका विषारी साप सह दोन विषारी सापांना पकडून जीवदान दिले.

कल्याण पश्चिमेतील रोनक सिटीच्या (Ronak City) लेबर कँम्प (Labour Camp) जवळ सहा फुटी घोणस विषारी सापला पकडून जीवदान सर्पमित्र दत्ता बोंबे दिल्याचे पाहता उपस्थित बांधकाम मजूर कुटुंबियांनी सुटेकचा निश्वास टाकला.

तर वाडेघर हिऱ्याचा पाडा लुल्ला कॉम्प्लेक्स फेज टू मध्ये परिसरातून दोन धामण प्रजातीच्या सापांना सर्पमित्र दत्ता बोंबे यांनी पकडून जीवदान देत उपस्थितीत लोकांमध्ये धामण प्रजातीसाप बिन विषारी असून तो आपल्या भक्ष्य उंदीराच्या मागावर येत असल्याबाबत माहिती देत जनजागृती केली. याच परिसरात एका घराच्या बेडरूममध्ये भितीच्या प्लास्टरच्या फटीत जाऊन बसलेल्या बिन विषारी सापास पकडून सर्पमित्र दत्ता बोंबे जीवदान दिल्याचे पाहता घरात साप घरात असल्याने भितीने उडलेली धंदाल दूर झाली.

पकडलेल्या चारही सापांना कल्याणच्या वनखात्याला दाखवून जीवनदान देत त्यांना निसर्गात मुक्त करण्यात आले असल्याची माहिती सर्पमित्र दत्ता बोंबे यांनी दिली.