कल्याण महिला पोलिस कर्मचारी दोन दिवसांपासून बेपत्ता; पोलिसांकडून शोधमोहिम सुरू

नवी मुंबईत कार्यरत असलेली एक महिला पोलिस कर्मचारी (Woman Police Missing) दोन दिवसांपासून बेपत्ता असल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. कल्याणच्या बाजारपेठ पोलिस ठाण्याच्या (Bajarpeth Police) पोलिसांनी बेपत्ता महिला पोलिस कर्मचारीचा शोध सुरु केला आहे. ही महिला एका पोलिस कर्मचाऱ्यासोबत निघून गेल्याची शक्यता आहे.

    कल्याण : नवी मुंबईत कार्यरत असलेली एक महिला पोलिस कर्मचारी (Woman Police Missing) दोन दिवसांपासून बेपत्ता असल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. कल्याणच्या बाजारपेठ पोलिस ठाण्याच्या (Bajarpeth Police) पोलिसांनी बेपत्ता महिला पोलिस कर्मचारीचा शोध सुरु केला आहे. ही महिला एका पोलिस कर्मचाऱ्यासोबत निघून गेल्याची शक्यता आहे. कारण दोघेही कामावर गैरहजर आहेत. जोपर्यंत महिला पोलिस कर्मचारी सापडत नाही. तोपर्यंत या प्रकरणाचा खुलासा होणार नाही.

    कल्याणमध्ये राहणारी एक 24 वर्षीय महिला पोलिस कर्मचारी जी बाजारपेठ पोलिस ठाण्याच्या हद्दीत राहते. ती अचानक बेपत्ता झाली. घरी न आल्याने तिच्या कुटुंबियांनी याची तक्रार बाजारपेठ पोलिस ठाण्यात केली आहे. ही महिला पोलिस कर्मचारी नवी मुंबईतील पोलिस ठाण्यात कार्यरत आहे. काल 15 ऑगस्ट स्वातंत्र्यदिनी ध्वजारोहन कार्यक्रमासाठीही देखील गैरहजर होती. बाजारपेठ पोलिस ठाण्याने तिचा शोध सुरु केला आहे. याच दरम्यान पोलिसांकडे आणखीन एक महिती समोर आली आहे.

    नवी मुंबईतील एका पोलिस ठाण्यातील पोलिस कर्मचारी दोन दिवसांपासून कामावर आलेला नाही. बेपत्ता महिला पोलिस आणि कामावर गैरहजर असलेला पोलिस कर्मचारी यांच्यात प्रेमसंबंध असल्याची चर्चा आहे. दोघांकडून अद्याप कोणताही संपर्क केला गेला नसल्याने दोघांच्या कुटुंबियांकडून चिंता वाढली आहे. पोलिस सर्व अंगाने या प्रकरणाचा तपास करत आहेत. बेपत्ता महिला पोलिस लवकरात लवकर सापडली पाहिजे. जोपर्यंत ती महिला समोर येऊन काही सांगत नाही. तोपर्यंत या प्रकरणाचा खरा उलगडा होणार नाही.