कान्हे रेल्वे गेट बंद; नागरिक हैराण; उड्डाणपूल उभारण्याची मागणी

कामशेत कान्हे फाटा रेल्वे गेट वारंवार बंद असते. त्यामुळे येथील कामगार वर्गाला तब्बल आठ किलोमीटर चा वळसा घालून कामावर हजर राहावे लागते. येथील वाहनकोंडीमुळे परिसरातील नागरिक हैराण झाले आहेत. येथील औद्योगिक कंपन्या ह्या वाहनकोंडीमुळे अन्यत्र स्थलांतरित होण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे औद्योगिक स्थलांतर रोखण्यासाठी येथे उड्डाणपुल उभारावा अशी मागणी कामगार वर्गातून होत आहे.

    गेट बंद असल्यास होतो मनस्ताप

    कान्हे, टाकवे ह्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात औद्योगिक कंपन्या आहेत. या ठिकाणी कच्च्या मालाचा पुरवठा करणाऱ्या मालवाहतूक गाड्या येत असतात. ह्या वाहनांना कंपनी मध्ये जाण्यासाठी रेल्वे गेट ओलांडून जावे लागते. त्यामुळे जर रेल्वे गेट बंद असेल तर नाहक मनस्ताप होतो.

    कंपन्या स्थलांतर करण्याच्या मार्गांवर

    येथील रेल्वेरुळावरून लोकल, एक्सप्रेस आणि मालगाड्या दिवसातून अनेक वेळा ये – जा करीत असतात. त्यामुळे रेल्वे गेट सतत बंद करावे लागते. तांत्रिक बिघाडामुळे रेल्वे उभी राहते तर कधी रेल्वे गेट नादुरुस्त झाल्याने उघडत नाही. त्यामुळे वाहनांच्या मोठमोठ्या रांगा लागतात. कच्चा माल वेळेवर पोचत नसल्याने येथील कंपन्या स्थलांतर करण्याच्या मार्गांवर आहेत. त्यामुळे मावळातील तरुण बेरोजगारीच्या मार्गावर आहे.

    वाहतूक कोंडीमुळे कामावर जाण्यास उशीर होतो. कामावर पोचण्यासाठी उशीर झाल्यास लेटमार्क लागतो त्यामुळे पगारावर परिणाम होतो. येथे उड्डाणपुलाची अत्यंत गरज आहे.

    - कैलास बनसोडे, कामगार.