
कणकवली तहसीलदार कार्यालयात ३० महसूल कर्मचारी जन्म-मृत्यू नोंद रजिस्टर तपासणी दिवसभर केली.
कणकवली : महाराष्ट्र सरकार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा समाज नेते मनोज जरांगे पाटील यांना जात प्रमाणपत्र देण्याचे आश्वासन दिल्यानंतर “मराठा कुणबी” नोंद महसूल विभागाने सुट्टी दिवशीही कणकवली तहसीलदार कार्यालयात तहसीलदार दीक्षांत देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली मोहिम राबविण्यात आली आहे.
कणकवली तहसीलदार कार्यालयात ३० महसूल कर्मचारी जन्म-मृत्यू नोंद रजिस्टर तपासणी दिवसभर केली. त्यात काही गावातील लोकांच्या कुणबी अशा नोंदी सापडल्या आहेत. मात्र, कुणबी मराठा किंवा मराठा कुणबी अशा नोंदी कणकवली तालुक्यात आढळून आल्या नाहीत. सर्वाधिक नोंदी या हिंदू – मराठा आढळून आल्या असल्याचे महसूल विभागाच्या वतीने सांगण्यात आले.
मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी बेमुदत आंदोलन छेडले. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार युद्धपातळीवर कुणबी नोंद तपासणी मोहीम सुरु आहे.