
पुढील कबड्डी स्पर्धा जिल्हा खेळाडू संघटक समिती यांच्याच मार्गदर्शनाली खेळण्याचा निर्णय घेतला.
कणकवली : कणकवली तालुक्यातील आजी माजी कबड्डीपटू, संघटक, आयोजक यांची नुकतीच सभा पार पडली. कणकवली तालुक्यात सिंधुदुर्ग जिल्हा कबड्डी फेडरेशनच्या निवड चाचणीवर बहिष्कार घालून यापुढे जिल्हा कबड्डी फेडरेशनची कुठलीही निवड चाचणी होऊ न देण्याचा निर्णय तालुक्यातील १४ संघानी एकत्रित घेतला.
सिंधुदुर्ग जिल्हा कबड्डी फेडरेशनच्या मनमानी कारभाराला कंटाळून जिल्ह्यातील अनेक संघानी एकत्रित येऊन काही दिवसांपूर्वी सिंधुदुर्ग जिल्हा कबड्डी फेडरेशनच्या विरोधात आपली खदखद व्यक्त करून भुमिका स्पष्ट केली होती. त्यानंतर कणकवली तालुक्यातील कबड्डी संघ, संघटक, आयोजक यांनी कणकवली येथे नुकतीच चौडेश्वरी सभागृहात सभा आयोजित करून कबड्डीपटूंच्या हिताच्या दृष्टीने चर्चा करून तालुक्यातील १४ संघानी निवड चाचणीवर बहिष्कार घातला. यावेळी जिल्हा खेळाडू संघटक समिती यांनी जो निर्णय घेतला त्याच निर्णयावर सर्वांनूमते ठाम राहण्याचे ठरविण्यात आले. पुढील कबड्डी स्पर्धा जिल्हा खेळाडू संघटक समिती यांच्याच मार्गदर्शनाली खेळण्याचा निर्णय घेतला. सर्व कबड्डीपटू, संघटक, आयोजक हे जिल्ह्यातील कबड्डीपटूंच्या पाठीशी ठाम उभे राहणार असल्याचा विश्वास देण्यात आला.