
सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या प्रवेशद्वारावर खारेपाटण येथे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचे आमदार नितेश राणे यांनी स्वागत केले.
कणकवली : कणकवलीत घर चलो अभियानांतर्गत भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी बाजारपेठेत जनतेशी संवाद साधला. नागरिकांशी हितगुज साधत आ.बावनकुळे यांनी सरकारच्या वतीने राबविण्यात आलेल्या कामगिरीबद्दल चर्चा केली. नागरिकांनी उस्फूर्तपणे स्वागत केले. कणकवली येथे ढालकाठी ते केंद्रीय मंत्री नारायण राणे संपर्क कार्यालयापर्यत भाजपा घर चलो अभियानांतर्गत भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी जनतेशी संवाद साधला. यावेळी आम.नितेश राणे, माजी खा.निलेश राणे, माजी आमदार राजन तेली, भाजप जिल्हा अध्यक्ष प्रभाकर सावंत, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी, भाजपा उपाध्यक्ष गोट्या सावंत, माजी नगराध्यक्ष समीर नलावडे, बँकेचे संचालक विठ्ठल देसाई, बाबा परब, समीर सावंत, कणकवली तालुका अध्यक्ष श्री संतोष कानडे, माजी जि.प.सदस्य श्री रवींद्र जठार, बंडू हर्णे, मिलिंद मेस्त्री, समीर प्रभूगावकर, संदीप मेस्त्री, स्वप्निल चिंदरकर, संजय कामतेकर आदींसह भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते.
सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या प्रवेशद्वारावर खारेपाटण येथे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचे आमदार नितेश राणे यांनी स्वागत केले. भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून लोकसभा मतदार संघाचा आढावा घेण्यासाठी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे राज्यव्यापी लोकसभा दौऱ्यावर सिंधुदुर्ग जिल्ह्यात दिनांक १९ ऑक्टोंबरला सायंकाळी ४.४५ वाजता खारेपाटण येथे दाखल झाले. आमदार नितेश राणे यांनी बावनकुळे यांचे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या प्रवेशद्वारावर स्वागत केले. सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या प्रवेशद्वारावर खारेपाटण येथे मोठ्या संख्येने भाजपा कार्यकर्ते दाखल झाले होते. बावनकुळे याच्या स्वागताचा जल्लोष खारेपाटण येथे दुमदुमत होता. ढोलपथक, फटाके यांच्या आतिषबाजी सिंधुदुर्ग जिल्ह्याचे प्रवेशद्वार गाजत आहे. या दौऱ्यात घर चलो अभियान, विधानसभा ३०० कार्यकर्ता बैठक घेण्यात आली.